Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचं महाविकास आघाडीला आव्हान! अडीच वर्षांच्या कारभाराचा हिशेब द्या ?

Eknath Shinde challenge Mahavikas Aghadi: अडीच वर्षांच्या कारभाराचा हिशोब द्या? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला दिले थेट आव्हान.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकींसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांची खलबतं सुरू होती. त्यामुळे या दोघांमध्ये चुरशीची लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. काल 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी, अनेक ठिकाणी अजूनही बंडखोर आपल्या भूमिकांवर ठाम आहेत.

कोणत्या जागांवर कोणते उमेदवार निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे राज्यात प्रचाराचा धुराळा सुरु झाला आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला चॅलेंज दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण करत ‘लाडकी बहीण’ योजनांचा उल्लेख करत विरोधकांवर डिवचले. "लाडक्या बहिणी इथे आहेत, आता त्यांना भाऊबीज दरवर्षी नाही तर दर महिन्याला मिळणार आहे.

विरोधक सतत लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या पाठी लागले आहेत. विरोधी पक्षांनी लाडकी बहीण योजना बंद करण्याचा प्रयत्नही केला आहे. माझ्या लाडक्या बहि‍णींसाठी हा तुमचा लाडका भाऊ जेलमध्ये जायला तयार आहे,"असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
Raj Thackeray Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर महिलेचा भोजपुरी गाण्यावर डान्स, राज ठाकरे बरसले

"आधीचे सरकार हप्ते घेणारे होतं. त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. अडीच वर्षात महाविकास आघाडीने (MVA) काय केलं आणि आम्ही दोन वर्षात काय केलं याचा हिशोब आम्ही देऊ. होऊन जाऊ द्या दुध का दुध पाणी. आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत, तुम्ही देणार का?" असे ओपन चॅलेंज एकनाथ शिंदेंनी दिले.

Eknath Shinde
Eknath Shinde: राजश्री अहिरराव यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले, `काय` आहे प्रकरण!

योजनेला विरोध का ?

"जर तुमच्याकडे कोणी मत मागायला आलं तर त्यांना जाब विचारा की लाडकी बहीण योजनेला विरोध का केला? ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात का गेलात? हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com