Maratha Andolan_Azad Maidan 
मुंबई

Maratha Andolan : आझाद मैदानात एका आंदोलकाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Maratha Andolan : मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरु आहे. शुक्रवारी सकाळपासून या उपोषणाला सुरुवात झाली.

Amit Ujagare

Maratha Andolan : मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरु आहे. शुक्रवारी सकाळपासून या उपोषणाला सुरुवात झाली. त्याच दिवशी रात्री इथं एका आंदोलकानं गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. या प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीला हा प्रयत्न केला तेव्हा तिथं असलेल्या इतर काही आंदोलकांनी त्याला वाचवलं, त्यामुळं त्याचे प्राण वाचू शकले, अशी माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

बेमुदत उपोषणाचा आजचा दिवस संपला सरकारनं उद्याच्या दिवसासाठी आंदोलकांना मुदत वाढवून दिली आहे. इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाज मुंबईत दाखल झाला पण अद्याप सरकारनं मनोज जरांगे यांनी सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांबाबत सरकारनं कोणताही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळं निराश झालेल्या एका आंदोलक व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, असं सुत्रांकडून कळतं आहे.

दरम्यान, या प्रकारावर आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आंदोलकांनो तुम्हाला जर असं काही करायचं असेल तर मी उपोषण सोडून देईल, असा इशारा यावर मनोज जरांगे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT