Manoj Jarange, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange on Maratha Reservation : 'हट.. त्याचं नावपण घ्यायचं नाही' ; जरांगे भुजबळांना म्हणाले..

Manoj Jarange on Maratha Reservation : 'आजच्या आनंदाच्या चांगल्या दिवशी...'

Chetan Zadpe

Mumbai News : मराठा समाज आरक्षणासाठी आर - पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगेच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या आता मान्य करण्यात आले आहे. सरकारने मध्यरात्रीच यासंदर्भातील अध्यादेश काढल्याची खात्रीशीर माहिती आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे यांची भेट आता घेणार आहेत. मुंबईत मराठ्यांचा जल्लोष सुरु आहे. दरम्यान या विजयी रॅलीच्या वेळी जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (Manoj Jarange on Maratha Reservation)

विजयी रॅलीवेळी प्रसारमाध्यमांनी जरांगे यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या आक्षेपांबाबत विचारले असता जरांगे यांनी त्यांचा उल्लेख करण्याचे टाळले. जरांगे म्हणाले, 'हट.. आजच्या आनंदाच्या, चांगल्या दिवशी त्याचं (छगन भुजबळ) नावपण नाही घ्यायचं. अशांना उत्तरच द्यायचं नाही. त्यांना काही किंमत द्यायची नाही. त्यांनी आयुष्यभर नुसती टीका टिप्पणीच केली. आजच्या आनंदाच्या दिवशी अशांचं नावच मला घ्यायचं नाही, अशा शब्दात त्यांनी भुजबळांचा नामोल्लेक करायचे टाळले.

जरांगेच्या प्रमुख मागण्या मान्य -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश काढला. तो अध्यादेश जरांगे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. मनोज जरांगेंसोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.

समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन -

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून, आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या उपस्थित आपली विजयी सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT