Manoj Jarange on Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे जिंकले; सरकारकडून सर्व मागण्या मान्य; गुलाल उधळणार...

Manoj Jarange Speechh on Maratha Reservation : मुंबईत गुलाल उधळायला येणार...
Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Maratha Morcha : Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange on Maratha Reservation : मराठा समाज आरक्षणासाठी आर - पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगेच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आले आहेत. सरकारने मध्यरात्रीच या संदर्भातील अध्यादेश काढल्याची माहिती आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जरांगे यांची भेट आता घेणार आहेत. त्यानंतर जरांगे उपोषण सोडणार आहेत. (Latest Marathi News)

Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange on Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे जिंकले; सरकारकडून सर्व मागण्या मान्य; गुलाल उधळणार...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश काढल्याची माहिती आहे. तो अध्यादेश जरांगे यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात काल रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे देखील उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संध्याकाळी भाषणात नमूद केलं होतं की, "आजच्या आज अध्यादेश नाही निघाला तर मग मराठा बांधव उद्या मुंबईला येतील. जर अध्यादेश मिळाला आणि तो योग्य असला तर ते गुलाल उधळायला मुंबईला येणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे जरांगे पाटील आज मुंबईत गुलाल उधळायला येणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.

समस्त मराठा समाज बांधवांचे अभिनंदन -

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढले असून, आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. आज सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या उपस्थित आपली विजयी सभा होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

(Edited By -Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com