Mumbai News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. काही ठिकाणी वाहनांची जाळपोळ, तर काही ठिकाणी आमदारांची घरं पेटवल्याची घटना घडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीचा लढा तीव्र होत असतानाच आता मराठा आरक्षणाच्या हिंसक आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आंदोलकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आणि मनोज जरांगे पाटलांच्या सभेवर जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यानंतर आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली. आता सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे सदावर्ते आणि आंदोलक यांच्यातील वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 8 नोव्हेंबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे यावर आता हायकोर्ट काय टिप्पणी करतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.