Mla Disqualification Case : ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये व्हिपवरून खडाजंगी; नार्वेकरांचं सूचक विधान

Shiv Sena Mlas Disqualification Case Assembly Speaker Hearing : आमदार अपात्रतेप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सूचक विधान केलं आहे.
Rahul Narwekar On Shiv Sena MLA Disqualification
Rahul Narwekar On Shiv Sena MLA DisqualificationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेतली. आजची सुनावणी संपली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २१ तारखेला होणार आहे. तर दोन्ही गटांना १६ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

Rahul Narwekar On Shiv Sena MLA Disqualification
Thane News : 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांसाठी रस्ते मोकळे केले, ठाणे पोलिसांची चमचेगिरी'

आमदार अपात्रतेप्रकरणी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनातही सुनावणी घेणार आहे. ही सुनावणी सलग होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. दरम्यान, आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील शिंदे गटाच्या वकिलांवर भडकले होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोर आज ठाकरे गटाच्या वकिलांकडून व्हिप बजावण्यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीचा दाखला देत हा युक्तिवाद केला गेला. सर्वोच्च न्यायालयात सादर पुराव्यांच्या आधारे सुनावणी घ्या. इतर पुरव्यांची गरजच पडणार नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाला ई मेलद्वारे व्हिप पाठवण्यात आला होता. तर ठाकरे गटाचा व्हिप मिळालाच नाही, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांकडून करण्यात आला. तर शिंदे गटाला ई-मेलवर व्हिप मिळाल्याचा पुरावा आहे. आयटी तज्ज्ञांकडून ई-मेलची माहिती घ्यावी. तसंच शिंदे गटाचं व्हिप घटनाबाह्य होतं, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये यावेळी खडाजंगी झाली. यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंना सुनावले. तुम्ही वेगवेगळ्या याचिका दाखल करत राहिला तर सुनावणी लांबणीवर जाईल. आपल्याला या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. आणि सुनावणी पूर्ण करायची आहे. आणि ३१ तारखेच्या आधी सर्व सुनावणी पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या या विधानाने आता या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

Rahul Narwekar On Shiv Sena MLA Disqualification
Shiv Sena MLA Disqualification : कोर्टाने फटकारल्यानंतर अपात्रताप्रकरणी अध्यक्षांची पहिलीच सुनावणी; ठाकरे गटाचे लक्ष!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com