Manoj Jarange Morcha Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil Morcha : संघर्षाची ठिणगी, परवानगी नाकारूनही मनोज जरांगे आझाद मैदानावर ठाम

Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र यावे किंवा एकटे यावे, मात्र यावर तोडगा काढावा, असे आपण शेवटचे आवाहन करीत असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे.

Roshan More

Mumbai : मनोज जरांगे-पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. त्यांना आंदोलनाची परवानगी नाकारल्याची नोटीस आझाद मैदान पोलिसांनी काढली आहे. त्यावर आपण चालत राहू, मुंबईला पोहोचू, असे सांगत आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र यावे किंवा एकटे यावे मात्र, यावर तोडगा काढावा, असे आपण शेवटचे आवाहन करीत असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. Manoj Jarange Patil Morcha

मुंबईकर आणि आमचे हाल होऊ नयेत, ही मनापासून इच्छा आहे. शिष्टमंडळ जेथे येईल त्या ठिकाणी चर्चा करण्याची तयारी आहे. ऊन, वाऱ्यात आमचे हाल होत आहेत. फक्त मुंबईकरांचे हाल होत नाहीत, तर इतरांचे हाल होत आहेत, हे मला मान्य आहे, असे जरांगे-पाटील म्हणाले. शिष्टमंडळ भेटायला येत आहेत. आपण त्यांचीशी चर्चा करू. मात्र, मुंबईत आंदोलन करण्यावर जरांगे-पाटील (Manoj Jarange) ठाम असल्याने सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखावे, यासाठी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांना जरांगे पाटील यांना नोटीस देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी नोटीस देत आंदोलनासाठी छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील आझाद मैदानात परवानगी देण्यास नकार दिला आहे.

बंद दाराआड चर्चा करणार नाही

आपल्याला लोणावळ्यामध्ये शिष्टमंडळ भेटायला येणार आहे. त्यामध्ये जे अधिकारी होते. आधी ज्या शिष्टमंडळाने सांगितले तेच परिपत्रक हे शिष्टमंडळ देऊन गेले. मात्र, आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. कितीही शिष्टमंडळ येऊ द्या आम्ही चर्चा करू. मुंबईला जात असताना वाटेतसुद्धा आमची चर्चा करण्याची तयारी आहे. जेवण करताना शिष्टमंडळ आले होते, म्हणून त्यांच्यासोबत चर्चा केली. येथून पुढे बंद दाराआड चर्चा होणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT