Pune News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे-पाटील यांचा विराट मोर्चा आता मुंबईकडे कूच करत आहे. काल रात्री लोणावळ्यातील मुक्कामानंतर आज सभा पार पडली. शेवटच्या मराठाबांधवाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे. यावेळी त्यांनी त्यांची प्रकृती साथ देत नसल्याचाही उल्लेख केला आहे. यामुळे एक भावनिकतेची लाट मराठा समाजात पसरल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)
लोणावळा येथील सभेत मनोज जरांगे म्हणाले, "काल मोर्चामध्ये पाचच्या सुमारास मला गाडीत अचानक झोप लागली. माझ्या माय-माऊलींनी झोपेतच मला ओवाळलं. मात्र काल रात्री झोप झाली नाही. या ठिकाणी सकाळी सव्वासातला पोहोचलो. मागील 48 तास झाले शरीराला झोपच नाही. त्यामुळे सकाळी अचानक थोडी झोप लागली. आता कान दुखतोय, वात आल्यासारखं वाटतंय. माझे पाय सुजले आहेत. पाय उचलता येईना, म्हणून इथे पोहोचायला थोडा उशीर झाला."
"आपल्याला मुंबईला जायचं आहे. आता फक्त वाशीचा एकच मुक्काम राहिला आहे. आता थेट मुंबई गाठायची आहे. आजपासून मोर्चाची गर्दी वाढणार आहे. एवढी गर्दी आयुष्यात कधी पाहिली नाही. शेवटच्या मराठ्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ करतंय का, याकडे लक्ष ठेवा. कुणी अनुचित प्रकार करीत असेल तर मग तो आपला असेल किंवा कुणाचाही असेल, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या. आपल्या मोर्चात माता-माऊली येणार आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगा. कितीही थंडी वाजली तरी माघार घ्यायची नाही, आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे फिरायचं नाही, असा इशाराही जरांगेंनी दिला.
(Edited By - Chetan Zadpe)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.