Manoj Jarange Patil News : Ajay Baraskar Maharaj On Manoj Jarange Patil :  Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange Patil News : "ज्याची संपत्ती 300 कोटी तो 40 लाख कशाला घेईल?" जरांगेंवर बारसकर बरसले!

Ajay Baraskar Maharaj On Manoj Jarange Patil : जरांगेंनी माझ्यावर बलात्कार, विनयभंगाचे आरोप केले...

Chetan Zadpe

Maratha Reservation News : मराठा आंदोलनासाठी लढाई पुकारणारे मनोज जरांगे पाटलांविरोधात त्यांचे पूर्वीचे सहकारी अजय महाराज बारसकरांनी काही गंभीर आरोप केले आहेत. बारसकर हे वारंवार जरांगे पाटलांविरोधात भूमिका मांडत आहेत. नुकतेच देहू संस्थानने बारस्कर यांचा आमच्याशी काही संबंध नसल्याचे जाहीर केले होते. आता स्वत: बारसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या आरोपावर उत्तर दिले आहे. (Manoj Jarange News)

बारसकर म्हणाले, "विरोधात बोलण्यासाठी सरकारकडून 40 लाख रुपये घेतल्याचा जरांगेंनी माझ्यावर आरोप केला होता. माझा सगळ्या मराठा बांधवांना सांगणं आहे, एखाद्या अशा सज्जन माणसावर यापूर्वी एकही आरोप झाला नाही. त्याच्यावर कसले आरोप करता. जरांगेंनी माझ्यावर बलात्कार, विनयभंग, तीनशे कोटींची संपत्ती आता 40 लाख सरकारकडून घेतल्याचा आरोप केला. माझा जरांगेंना जाहीर सवाल आहे, जर जरांगेंच्या (Manoj Jarange Patil) म्हणण्यानुसार माझ्याकडे तीनशे कोटींची संपत्ती असेल तर मी 40 लाख घेईन का?"

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारसकर म्हणाले, "जरांगे म्हणतात माझा आणि बारस्करांचा काही संबंध नाही. मी जरांगेंच्या आंदोलनस्थळी गेलाे म्हणालो पाणी प्या. खरंतर त्यांनीच मला तिथं बोलावलं होतं, मी स्वत:हून तिथे गेलो नाही. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मी लवकरच पुरावे सादर करणार आहे. यांनी तुकाराम महाराजांना संत अन् फंत बोलून अपमान केला. माझा देहू संस्थानशी काही संबंध नसेल, पण देहू संस्थान हा अपमान कसा सहन करू शकतो? असं बारसकर म्हणाले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT