Amit Shah Eknath Shinde Manoj Jarange Patil .jpg Sarkarnama
मुंबई

Amit Shah: जरांगे पाटलांच्या उपोषणामुळं सरकार संकटात,अमित शाहांची शिंदेंसोबत 'मॅरेथॉन' बैठक; मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार?

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल होण्याआधीपासून त्यांच्या या आंदोलनामागं एकनाथ शिंदे असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच मुंबईला निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट करतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलू दिले जात नसल्याचं म्हटलं होतं.

Deepak Kulkarni

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवार (ता.29) पासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यामुळे सरकारसह मुंबई महापालिकेची झोप उडाल्याचं दिसून येत आहे. या महाराष्ट्रात पुन्हा पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एन्ट्री झाली आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणामुळे रान पेटलेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर आता मराठा आरक्षणासह राजकीय मुद्द्यांवरच लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या दबावाला झुगारुन लावतानाच मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर काढा अशी मागणी लावून धरली आहे. तर दुसरीकडे मुंबईत दाखल झालेला मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मराठा आरक्षणाच्या तापलेल्या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुद्द्यावरही चर्चा केली. यावेळी अमित शाहांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक साधारण तासभर सुरु होती.

अमित शाह आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या बैठकीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे काय पर्याय आहेत, यावर चर्चा करण्यात आली. सरकार आणि आंदोलक यांच्यातला संवाद आणि पुढचं पावलांवर शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाचं बोलणं झालं असल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे अमित शाह यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान राज्यातील आंदोलनाची सद्यस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त आणि आंदोलकांच्या मागण्यावर यावर चर्चा झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठा आऱक्षणासंदर्भात विचारण्यात आलं असता, त्यांनी एकनाथ शिंदे आल्यावर त्यांनाच याबद्दल विचारा असं सांगितलं. "या सगळ्या गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदे देऊ शकतात. ते येतील तेव्हा त्यांना विचारा. सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेl. मागच्या वेळी तिकडे गेले होते, नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असताना ते परत का आले आहेत?," अशी विचारणा राज ठाकरेंनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत दाखल होण्याआधीपासून त्यांच्या या आंदोलनामागं एकनाथ शिंदे असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच मुंबईला निघण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना जरांगेंनी मोठा गौप्यस्फोट करतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलू दिले जात नसल्याचं म्हटलं होतं.

तसेच एका मराठा महिला आंदोलकानी माध्यमांशी बोलताना आमची राहण्याची, झोपण्याची, खाण्या-पिण्याची व्यवस्था शिंदे साहेबांनी केली असल्याचा दावा केला होता. पण त्याचवेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलेनं तिला थांबवत बाजू सावरुन घेतली,याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT