Taywade hunger strike: मुंबईत जरांगे तर नागपुरात तायवाडेंचे उपोषण; राज्यभरात वातावरण तापलं !

Maharashtra political tension News : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्या दबावाला महायुती सरकारने बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
Manoj jarange patil vs babanrao taywade
Manoj jarange patil vs babanrao taywade Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मराठा समाजाचा ओबीसी समावेश करून आरक्षण देण्याचा मनोज जरांगे यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने साखळी उपोषण सुरू केले आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्या दबावाला महायुती सरकारने बळी पडू नये, असे आवाहन केले आहे. असे झाल्यास ओबीसी महासंघही मुंबईत धडक देईल, असा इशारा दिला.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबईत धडकले आहेत. त्यांच्या आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. आरक्षण दिल्याशिवाय आता माघार घेतली जाणार नाही, असे त्यांनी सरकारला बजावले आहे. त्यामुळे सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. जरांगे यांनी स्वतंत्र आरक्षणाचा मागणी धुडकावून लावली आहे. त्यांना ओबीसी समाजातूनच आरक्षण हवे आहे. दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्यास तीव्र विरोध आहे.

Manoj jarange patil vs babanrao taywade
Devendra Fadnavis On Manoj Jarange: जरांगे यांच्या आंदोलनावर सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले, 'मराठा आरक्षणाबाबत कायदेशीर, संविधानात्मक मार्ग...'

ओबीसीमध्ये आधीच साडेतीनशे जातींचा समावेश आहे. त्या तुलनेत मिळणारे २७ टक्के आरक्षण अपुरे आहे. त्यात मराठा समाजाला समाविष्ट केल्यास ओबीसीच्या वाट्याला काहीच येणार नाही. त्यांच्यावर अन्याय होईल, असे तायवाडे यांचे म्हणणे आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. त्यांना सरकारने स्वतंत्र सरकारने स्वतंत्र आरक्षण द्यावे, आम्ही त्याचे स्वागत करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Manoj jarange patil vs babanrao taywade
Nagpur BJP: नगरसेवकांचा 120 चा आकडा कसा गाठणार? नागपुरात भाजपचा कस लागणार

जरांगेच्या दबावात ओबीसीवर होण्याची शक्यता असल्याने आम्ही साखळी उपोषण, त्यानंतर आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. गरज भासल्याच मुंबईतही जाऊन आंदोलन करून असे तायवाडे यांनी सांगितले. असे असले तरी जरांगे यांच्या हट्टामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद चिघळणार असल्याचे दिसून येते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मोठा राजकीय वाद उद्‍भवला आहे.

Manoj jarange patil vs babanrao taywade
Shivsena MLA Attack: खळबळजनक! एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आमदारावर हल्ला; संगमनेरमधलं राजकारण पेटलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधक हे मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावत असल्याचा आरोप केला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे का ? याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका जाहीर करावे, असे आवाहन केले आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावरून आंदोलनाला राजकीय स्वरूपही आले आहे.

Manoj jarange patil vs babanrao taywade
Nashik BJP Politics: भाजपच्या ‘100 प्लस’ घोषणेने एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या इच्छुकांची झोप उडाली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com