Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde In Adhiveshan : अनेक ज्योतिषी आले, भविष्य सांगितलं पण सरकार मजबूत होत गेलं; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर टीका अन् टोमण्यांचा भडीमार

Maharashtra Assembly Session : अधिवेशनात श्वेतपत्रिका काढण्याचे सरकारचे धाडस

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : सध्याचे विरोधक कधी नव्हे इतके गोंधळलेले आहेत. पूर्वी सर्व कामांचा, बोलण्याचा दर्जा घसरून टोमण्यांचा जमाना आला होता. सरकार पाडणारे, मुख्यमंत्री बदलणारे दररोज नवनवीन ज्योतिष तयार झाले, पण सरकार अधिक मजबूत झाले. हे सरकार 'ऑनलाईन' नसून दारात जाऊन काम करणारे आहे. सरकार पडणारे, मुख्यमंत्री बदलणारे अनेक ज्योतिषी होऊन गेले. आम्ही कुणालाही दोष देणारे नसून ठोस काम करणारे आहोत, असे सांगत अधिवेशनात टीका, टोमण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. (Latest Political News)

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदेंनी सरकारच्या कामाची माहिती देत विरोधकांवर टीका केली. विरोधी पक्षनेत्यांबाबत शिंदे म्हणाले, "लोकशाही बळकट करण्यासाठी विरोधकांची गरज असते. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी विरोधकांची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधी पक्षनेत्याची निवड होणे आवश्यक होते. मात्र आजच्या इतके कधी नव्हे इतके गोंधळलेले आहेत. त्यांनी आपला आत्मविश्वास गमावलेला आहे. या अधिवेशनात सर्वांना बोलायला संधी मिळाली. आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना तयारी करायला वेळ आहे."

अधिवेशनात उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढून खरे-खोटे करण्याचे धाडस दाखवल्याचे सांगून उदय सामतांचे शिंदेंनी कौतुक केले. शिंदे म्हणाले, "काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्याची टीका झाली, मात्र श्वेतपत्रिकेत जाहीर केली. राज्यात एक लाख १८ हजार कोटींनी गुंतवणूक झाली. यामुळे गुंतवणूक राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकावर गेले आहे. दावोसमधील झालेल्या एमओयूची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. शासन आपल्या दारी उपक्रमातून सव्वा कोटी नागरिकांना फायदा झाला. महाविकास आघाडीत अहंकारामुळे काही प्रकल्प रखडवले होते. ते प्रकल्प युतीचे सरकार आल्यानंतर मार्गी लावले. आम्ही अॅक्शन घेतो, फिल्डवर जाऊन काम करतो, हे सरकार घरी बसून काम करणारे नाही."

शिंदेंनी सरकार पडण्याची, मुख्यमंत्री बदलाची भाषा करणाऱ्यांनाही यावेळी लक्ष्य केले. शिंदे म्हणाले "वर्षभर सरकार पडणार, पडणार पडणार असे म्हणत होते. दररोज नवीन ज्योतिष तयार होऊन नवीन मुख्यमंत्री होण्याची चर्चाही होत होती. यात नाना पटोलेही आघाडीवर होते. आधी १७० आमदारांचे पाठबळ होते, मात्र विकासाचा वेग पाहून अजितदादाही बरोबर आहे. त्यामुळे संख्याबळ २१५ वर जाऊन सरकार मजबूतच झाले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT