Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : जरांगे-पाटलांच्या पदयात्रेचा मार्ग बदलला; नवी मुंबई पोलिसांची विनंती मान्य

Avinash Chandane

Navi Mumbai News :

मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील यांचा नवी मुंबई प्रवेश करण्याचा मार्ग बदलला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांनी हा मार्ग बदलला आहे. लोणावळ्यातून निघालेली मराठा आंदोलकांची पदयात्रा आज नवी मुंबईत विसावणार आहे.

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) हजारो मराठा आंदोलकांसह (Maratha Reservation) लोणावळ्यातून निघाले आहेत आणि आज रात्री त्यांचा मुक्काम नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत म्हणजेच APMC मध्ये असणार आहे. त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. पण मराठा आंदोलकांच्या पदयात्रेमुळे नवी मुंबई (Navi Mumbai), मुंबईच्या (Mumbai) वाहतुकीला मोठा फटका बसणार असल्यामुळे नवी मुंबई पोलिस चिंतीत होते.

नवी मुंबईचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे आणि इतर अधिकाऱ्यांनी लोणावळ्यात दुपारी जरांगे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना मार्ग बदलण्याची (Route Changed) विनंती केली. एक्स्प्रेस-वेऐवजी जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने नवी मुंबईत येण्याची विनंती केली. एक्स्प्रेस-वेवरील (Expressway) नियमित प्रचंड वाहतूक, शिवाय कळंबोली, नवी मुंबई परिसरातील रुग्णालयांमधील वर्दळ लक्षात घेऊन जरांगे-पाटील यांना मार्ग बदलण्याची विनंती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केली आणि जरांगे-पाटील यांनी विनंती मान्य केली. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा मोठा निःश्वास सोडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)

आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarakshan) मागणीसाठी निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या पदयात्रेचा (Route Changed) मार्ग असा असणार आहे...

जुना मुंबई-पुणे महामार्ग

खोपोली

चौक

कर्जत

कोन गाव

पनवेल-पळस्पे

गव्हाणपाडा-उलवे

बेलापूर किल्ला

पाम बीच रोड

तुर्भे-एपीएमसी

विशेष म्हणजे याअगोदर पुणे - मुंबई एक्स्प्रेसवेने जरांगे-पाटील यांची पदयात्रा येणार होती. पण हजारोंच्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांमुळे वाहतुकीला झळ पोहोचण्याची भीती नवी मुंबई पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यामुळे तातडीने मार्ग बदलण्याची विनंती जरांगे-पाटील यांना करण्यात आली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली.

20 जानेवारीला जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातून पदयात्रेला सुरुवात केली. मराठा आरक्षणासाठी ही पदयात्रा आरपार की लढाई मानली जाते. आरक्षण घेऊनच येणार, असा निर्धार करून जरांगे-पाटील यांनी ही पदयात्रा काढली आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT