Lonawala News : लोणावळ्यात गुरुवारी सकाळी मी झोपेत असताना कुणीतरी अधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी मला कोर्टाचा कागद असल्याचे सांगत माझी सही घेतली. आम्ही कोर्टाचा मानसन्मान ठेवतो, त्यामुळे मी लगेच त्या कागदावर सही केली. त्यात एक मराठी कागद होता, एक इंग्रजी कागद होता.
माझ्यासह यामध्ये इतर नऊ जण असल्याचे सांगत त्यांनी फसवून सही घेतली, पण या सहीचा जर येत्या काळात कोणी दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
लोणावळ्यातून मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असताना रस्त्यात भेटून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली होती. जरांगे जात असलेल्या रस्त्यावर मोठी रुग्णालयं असल्याने त्यांनी या मार्गाचा वापर न करता पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यांनी पोलिसांनी केलेली विनंती मान्य केली. त्यांचा आजचा मुक्काम वाशीमध्ये असणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मला येथील रस्ते माहिती नाहीत. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना त्याची कल्पना दिली आहे. आता कार्यकर्ते आणि पोलिस सांगतील त्या मार्गावरून जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी मुक्काम वाशीला असणार आणि उद्या आम्ही मुंबईतील आझाद मैदानावर जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)
दरम्यान, उद्या प्रजासत्ताकदिन आहे, पण त्याचा आणि मोर्चाचा आम्ही कोणताही संबंध जोडणार नाही. प्रजासत्ताकदिन हा सर्वात वर आहे. त्यामुळे आम्हीही तो साजरा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
R...