Manoj Jarange, Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane News : मराठ्यांचे नेते व्हा! टीका करीत बसू नका; राणेंचा जरांगे पाटलांना मैत्रीचा सल्ला

Nitesh Rane slams Manoj Jarange : जबाबदारीची विधानं केलीत तर विश्वासार्हता वाढेल...

Mangesh Mahale

Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आरक्षण मुद्द्यांवरून भाजपचे नेते, आमदार नितेश राणे आणि जरांगे पाटलांमध्ये वात पेटली आहे. एकमेकांवर टीका सुरू आहे. जरांगेंनी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांनो, भुजबळांना बळ देऊ नका, अशी टीका जरांगेंनी केली होती. त्यानंतर राणेंनी त्यांना डिवचलं आहे.

विनायक मेटेंचे कार्य पुढे नेण्याची संधी...

"जरांगे पाटलांनी ऊठ सूट सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा मराठा आरक्षणासाठी सरकार कसे सकारात्मक पावलं टाकत आहे, त्यावर त्यांनी लक्ष द्यावे, यानिमित्ताने त्यांना मराठा नेता बनण्याची चांगली संधी आहे. जे काम विनायक मेटेंनी सुरू केले ते पुढे सुरू ठेवण्याची संधी त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीची विधानं केलीत तर विश्वासार्हता वाढेल," असा मित्रत्वाचा सल्ला राणेंनी जरांगेंनी दिला आहे.

"कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार राज्य सरकारला असून, मर्यादा वाढवायची असेल तर तो विषय केंद्राचा आहे. 50 टक्क्यांच्या आत आम्हाला आरक्षण द्या," असे जरांगे पाटलांनी म्हटलं आहे. "आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका," असा इशारा राणेंना जरांगेंनी दिला आहे.

मराठा नेत्यांची गरज नाही...

छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचावर टीका केली होती. "मी त्यांना आवाहन केलं, साथ द्या म्हणून आता ते बोलतील," असं जरांगे पाटील म्हणाले. "आमच्या मराठा राजकीय नेत्यांनादेखील आम्ही गृहीत धरत नाही. आमच्या मराठा नेत्यांना आम्ही मोठे केले. ते आमचा वापर करतात; पण आमच्यासाठी ते नाही. आम्हाला त्यांची गरज नाही," असे मनोज जरांगे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT