Anant Geete News : शिंदे सरकारला सुप्रीम कोर्ट रोज जोडे मारतंय, सरकार कात्रीत सापडलंय; अनंत गीतेंचा हल्लाबोल

Thackeray Vs Shinde : सुनावणीस विलंब केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना फटकारले.
eknath shinde, Anant Geete
eknath shinde, Anant GeeteSarkarnama
Published on
Updated on

Mahad : माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी शिंदे सरकारबाबत मोठे भाकीत केले आहे. "निर्णय घेण्याची वेळ आली तर कोर्ट यांची वाट बघणार नाही, कोर्ट आपला निर्णय घेईल. पण शिंदे-फडणवीस-पवार सरकार आता कात्रीत अडकलंय आहे," असे अनंत गीतेंनी म्हटलं आहे. ते महाड येथे बोलत होते.

शिवसेना सोळा आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणीचे वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी येत्या सहा ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. 23 नोव्हेंबरपासून याचिकांवर उलटतपासणी होणार आहे. अंतिम निकाल कधी येणार, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. सुनावणीस विलंब केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना फटकारले आहे.

eknath shinde, Anant Geete
Ranajagjitsinha Patil News : ठाकरे पिता-पुत्राकडून ओमराजेंनी धडा घ्यावा; राणाजगजितसिंह पाटलांचा खोचक सल्ला

"विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिंदे गटाला सुप्रीम कोर्ट रोज जोडे मारतंय. पण शिंदे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, अशी टीका गीतेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली आहे. महाडमध्ये पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात गीते यांनी निशाणा साधला आहे.

सोळा आमदार अपात्रतेबाबत 13 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत अपात्रता सुनावणीबाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या अधिकृत कागदपत्रांची पाहणी केली जाणार आहे. कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी आणि कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येणार आहे.

20 ऑक्टोबर 2023 रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी आणि अतिरिक्त युक्तिवाद व कागदपत्रे रेकॉर्डवर आणण्याची मागणी करणाऱ्या ठाकरे गटाच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करणार आहेत.

eknath shinde, Anant Geete
Shoumika Mahadik News : शौमिका महाडिकांच्या पोस्टरची कोल्हापुरात चर्चा; 'अब दिल्ली दूर नही...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com