Vijay Wadettiwar News : मनुवाद्यांचा राम ऐकला, गांधीजींचा राम ऐकला असता तर हे भोगायची वेळ आली नसती; वडेट्टीवारांची कबुली

Maharashtra Politics : दोन अलिबाबा झाले आहेत. राज्याची तिजोरी कोण जास्त लुटतो, यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Wardha : "राम आमच्या हृदयात आहे. आम्ही रामाला पहिल्यापासून मानत होतो. पण 'या' मनुवाद्यांचा राम ऐकला. गांधीजींचा राम आम्ही ऐकला नाही. त्यामुळे हे भोगायची वेळ आली आहे. आता भोगावं तर लागणारच," अशी कबुली राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली.

"चुका आताही दुरुस्त करता येतील, वेळ गेलेली नाही. चूक दुरुस्त करा आणि पुढे जा," असे आवाहन वडेट्टीवारांनी बेरोजगार तरुणांना केले आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे, त्याला भाजप जबाबदार असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. वर्धा येथे कंत्राटी पदभरतीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला वडेट्टीवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपवर त्यांनी सडकून टीका केली.

Vijay Wadettiwar
Anant Geete News : शिंदे सरकारला सुप्रीम कोर्ट रोज जोडे मारतंय, सरकार कात्रीत सापडलंय; अनंत गीतेंचा हल्लाबोल

आता दोन अलिबाबा झाले आहेत...

"हे लुटारूंचे सरकार आहे. परीक्षेसाठी तरुणांकडून पैसे घेतले जात आहेत. पैसे कमविण्याचाच धंदा सरकारने सुरू केला आहे. परीक्षा नाही झाली तर पैसे परत दिले जात नाहीत. व्याजावर व्याज कमविण्याचं काम हे सरकार करीत आहे. पहिले सरकार होते अलिबाबा चाळीस चोर, आता सरकार आहे दोन अलिबाबा ऐंशी चोर... आता दोन अलिबाबा झाले आहेत. राज्याची तिजोरी कोण जास्त लुटतो, यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली. 'आपल्याच चुका आहेत, आपणच धर्म जाती-पातीच्या भानगडीत पडलो,' असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री खोटं बोलत नाहीत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे. "महाराष्ट्रात 21 लोक जे ईडीच्या रडारवर होते. ते सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली, स्वच्छही झाले. शिंदे काही खोटं बोलले नाहीच, ते अजिबात खोटं बोलत नाहीत. माणसाला शुद्ध करणारी नवीन मशीन आणि पावडर त्यांनी शोधलीय, असं वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar
Ranajagjitsinha Patil News : ठाकरे पिता-पुत्राकडून ओमराजेंनी धडा घ्यावा; राणाजगजितसिंह पाटलांचा खोचक सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com