The Bombay High Court had declared Manoj Jarange Patil's Maratha reservation agitation illegal and ordered him to vacate Azad Maidan by 3 pm. But no action was taken against him because of Satish Maneshind. Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मराठा बांधवांसाठी सर्वात पॉवरफुल वकील उतरला होता मैदानात : जरांगेंना कारवाईपासूनही वाचवलं!

Maratha Reservation: मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन बेकायदेशीर ठरवत दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचा आदेश दिला होता. पण सतीश मानेशिंद यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

Hrishikesh Nalagune

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर गुलाल उधळला आहे. त्यांची हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासह प्रमुख मागण्या फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सहकाऱ्यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय सुपूर्द केल्यानंतर त्यांनी विखे पाटील यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं.

जरांगे पाटील यांना या सगळ्या गोष्टी शक्य होण्यामागे एका पॉवरफुल वकिलाचाही मोठा वाटा आहे. दुपारी एक वाजता उच्च न्यायालयात आंदोलन आणि आंदोलक यांच्याबाबत महत्वाची सुनावणी पार पडली. यात जरांगे पाटील यांना तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे आणि मुंबई सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र आंदोलक मैदान आण त्याच परिसरात होते. त्यामुळे 3 वाजता होणाऱ्या सुनावणीत न्यायालय जरांगे पाटील यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची शक्यता होती.

3 वाजता झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मराठा आंदोलकांवर ताशेरे ओढले. आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी केवळ 24 तासांची परवानगी दिली होती. मग तुम्ही अजून तिथे का थांबला आहे? असा सवाल केला. यावर अॅड. सतीश मानेशिंदे यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठ आंदोलक यांची बाजू मांडली. त्यांनी शेवटच्या क्षणी युक्तिवाद करून वेळ मागून घेतली आणि सुनावणी उद्यापर्यंत तहकूब झाली.

मानेशिंदे म्हणाले. आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत. आतापर्यंत 54 मोर्चे शांततेत झाले, असेही सांगितले. यावर "तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसले आहात? तुम्हाला परवानगी नाही," असे उच्च न्यायालयाने सांगितले. त्यावर सतीश मानेशिंदे यांनी उद्यापर्यंतचा वेळ द्यावा अशी मागणी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाने जरांगे पाटील आणि आंदोलक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न देता मराठा आंदोलनाबाबतची सुनावणी उद्या म्हणजेच 3 सप्टेंबर दुपारी 1 पर्यंत तहकूब केली.

हा एकप्रकार मनोज जरांगे पाटील यांना दिलासाच ठरला. चार वाजल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपसमितीचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर आले. त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत चर्चा केली आणि मसुदाही दाखवला. हा मसुदा जरांगे पाटील यांनी मान्य केला. त्यानंतरच्या तासाभरात मंत्री विखे पाटील यांनी शासन निर्णय जरांगे पाटील यांच्या हातात सुपूर्द केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT