Maratha Reservation News Sarkarnama
मुंबई

Manoj Jarange : पुन्हा 'समजूतनाट्य', शिंदेंचे तीन शिलेदार जरांगेंचा निर्णय बदलणार?

Maratha Reservation: आरक्षणासाठी आजपर्यंत काय काम केले, याची माहिती शिष्टमंडळ जरांगेंना देणार

Mangesh Mahale

Mumbai News: मराठा आरक्षण जाहीर करण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. तत्पूर्वी सरकारचे शिष्टमंडळ आज (गुरूवार) त्यांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सांमत आणि संदीपान भुमरे यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाची डेडलाईन संपण्यापूर्वीच जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न हे तीन मंत्री करणार आहेत.

आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने आजपर्यंत काय काम केले, याची माहिती शिष्टमंडळ जरांगेंना देणार आहे. आरक्षणाबाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयाबाबत त्यांना माहिती देऊन त्यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबरला सरकार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची शक्यता आहे. आज दुपारी सरकारचं हे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी जरांगे-पाटील यांची समजूत काढण्याची जबाबदारी पुन्हा एकदा भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांच्यावर आली आहे.

दुसरीकडे जरांगे-पाटील यांची 23 डिसेंबरला बीडमध्ये निर्णायक 'इशारा सभा' होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. बीड शहरालगत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरामध्ये ही जाहीर सभा होत आहे. सकल मराठा समाजाकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. सभेसाठी मोठं ग्राउंड तयार करण्यात आले आहे. भव्य व्यासपीठाची उभारणी करण्यात येत आहे. 24 तारखेची सरकारला दिलेली डेडलाईन संपण्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी ही सभा होत असल्याने, या सभेत जरांगे काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेज आहेत. मराठा बांधवांनी मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, यामधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील मोर्चासाठी मराठा समाज ट्रॅक्टरने जाणार असल्याचा संशय नांदेड पोलिसांनी आहे. त्यांनी अजब फर्मान काढलं असून त्यांची चर्चा सुरु आहे. मराठा नेते, किंवा अन्य कोणी ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर त्यांना ट्रॅक्टर देऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना पाठवली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT