Maratha Reservation: मराठा नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका; पोलिसांचे अजब फर्मान...

Manoj Jarange News : मुंबईत 19 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू
Manoj Jarange News
Manoj Jarange News Sarkarnama
Published on
Updated on

Nanded: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेज आहेत. मराठा बांधवांनी मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, यामधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईतील मोर्चासाठी मराठा समाज ट्रॅक्टरने जाणार असल्याचा संशय नांदेड पोलिसांना आहे. म्हणून त्यांनी अजब फर्मान काढलं असून त्यांची चर्चा सुरु आहे. मराठा नेते, किंवा अन्य कोणी ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर त्यांना ट्रॅक्टर देऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना पाठवली आहे.

Manoj Jarange News
Parliament Winter Session: संसदेतील घुसखोरीला जबाबदार कोण? मोदींचे 'हे' विधान राजकीय मिमिक्री...

आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर हे आपण शेतीसाठीच्या कामासाठी घेतले आहे. त्यांचा वापर शेतीच्या कामासाठीच करा, मराठा आरक्षणासाठी 24 डिसेंबरच्या दरम्यान काही जण मुंबईकडे मोर्चासाठी जाणार असल्याची शक्यता आहे.त्यासाठी मराठा नेते, अन्य नागरिक ट्रॅक्टर मागण्यासाठी येतील, त्यांना ते देऊ नका. तुम्हीही ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना बजावली आहे. या सूचनेचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना अशी नोटीस पाठवली आहे .

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठा मोर्चाची शक्यता असल्याने मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबईत कलम 144 लागू केले आहे. यामुळे मुंबईकरांना कुठेही जमाव करता येणार नाही. मुंबई पोलिसांनी ही जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लागू केल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर मराठा आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन फेटाळून लावत जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली.

Edited by: Mangesh Mahale

Manoj Jarange News
Congress News: कार्यकर्त्यांनो, सत्ता, पदे आम्ही उपभोगतो; बैठका तुम्ही करा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com