Parliament Winter Session: संसदेतील घुसखोरीला जबाबदार कोण? मोदींचे 'हे' विधान राजकीय मिमिक्री...

PM Narendra Modi: संसदेत घुसखोरी का व कशी झाली? त्यास जबाबदार कोण?
Narendra modi
Narendra modi Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi: संसद भवनमधील घुसखोरी प्रकरणावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले आहे. या मुद्दावरून अधिवेशनात सरकारला जाब विचारणाऱ्या 141 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाने मुखपत्र 'सामना'मधून सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. संसदेत घुसखोरी का व कशी झाली? त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न सभागृहात विरोधकांनी विचारला, हा काय अपराध झाला? असा सवाल 'सामना'तून विचारण्यात आला आहे.

"संसदेत घुसखोरी झाली. बेरोजगार तरुणांनी हे कृत्य केले. याचा अर्थ अतिरेक्यांनी जर मनात आणले असते तर ते संसदेत याच पद्धतीने घुसू शकले असते आणि त्यांनी दहशतवादी कृत्य घडवून हाहाकार माजवला असता. संसदेत घुसखोरी का व कशी झाली? त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न सभागृहात विरोधकांनी विचारला, हा काय अपराध झाला? संसदेतील घुसखोरीसंदर्भात एक चार ओळींचे निवेदनच करायचे होते, पण त्याऐवजी लोकसभा, राज्यसभेतून विरोधकांना हाकलून दिले गेले आणि लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराचे सरकारने स्मशान करून ठेवले, असा हल्लाबोल 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Narendra modi
Congress News: कार्यकर्त्यांनो, सत्ता, पदे आम्ही उपभोगतो; बैठका तुम्ही करा...

येत्या 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत जाऊन भव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण करीत आहेत, पण त्यांनी लोकशाही मंदिराचे हे असे स्मशान करून ठेवले त्याचे काय? राम मंदिराचे उद्घाटन करण्याचा अधिकार यांना उरला आहे काय? असा अग्रलेखातून करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी बोलतात एक, पण करतात दुसरेच. लोक मूर्ख आहेत आणि जे मूर्ख नाहीत, त्यांना आपण सहज मूर्ख बनवू शकतो, असा त्यांचा आत्मविश्वास आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी या विषयावर बाहेर प्रवचने झोडण्यापेक्षा संसदेत बोलावे. संसदेचे अधिवेशन सुरू आहे आणि घुसखोरीबाबत पंतप्रधान, गृहमंत्री बाहेर खुलासे करीत फिरत आहेत. यावर जाब विचारणाऱ्या 141 खासदारांना सरकारने निलंबित केले. पुन्हा विरोधकांवर ठपका ठेवून पंतप्रधान मोदी लोकशाहीची मिमिक्री करीत आहेत, अशी टीका 'सामना'तून केली आहे.

Edited by: Mangesh Mahale

Narendra modi
Nagpur News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'; तुपकरांचा हल्लाबोल, पोलिस अन् शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com