Maratha Reservation Protest Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई; फडणवीसांच्या सूचना!

Devendra Fadanvis On Maratha Reservation Protest : हिंसक घटना घडून येत आहेत.

Chetan Zadpe

Maratha Agitation : मराठा आंदोलनाचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना राज्यभरात काही ठिकाणी या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटले. बीड येथे हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर अनेक भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळीच्या हिंसक घटना घडल्या. मनोज जरांगे यांनी हिंसक आंदोलन करू नका, असे आवाहन केले असले तरी हिंसक घटना घडून येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री काल याच पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या आढावासाठी बैठक घेतली होती. (Latest Marathi News)

काल रात्री उशिरा जवळपास एक तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि सर्व पोलिस दल प्रमुख उपस्थित होते.

हिंसक आंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तसेच जीवितहानीस कारणीभूत ठरणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करून अटक करण्याची कारवाई करण्यास सांगितली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याबाबतही निर्णय झाल्याची चर्चा आहे. राज्यात अनेक ठिकाणी बस, आमदारांचे घर जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतही खबरदारीचे पावलं उचलण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक नेत्यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT