Vijay Wadettiwar Sarkarnama
मुंबई

Vijay Wadettiwar News : EWS च्या जाहिरातीनं मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं; जरांगेंनी सरकारची केली फजिती...

Mangesh Mahale

Mumbai Latest News : राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत. अशातच काल (रविवारी) सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत EWS अंतर्गत मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती दिली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर सरकारला धारेवर धरले आहे.

"मराठा प्रश्नावर राज्य सरकारने चालवलेली जाहिरातबाजी म्हणजे मराठ्यांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. मनोज जरांगे पाटील हा एकच माणूस सरकारची फजिती करत असल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्र बघत आहे," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

"मराठ्यांचे कुठलेही प्रश्न न सोडवता केवळ जाहिरातबाजी करणे म्हणजे हे सरकार मनोरंजन करीत आहे," अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवारांना फटकारलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

EWS अंतर्गत १० टक्के आरक्षणातून विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये ३१ हजार विद्यार्थ्यांपैकी ७८ टक्के मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश, तसेच एमपीएससीमार्फत सरकारी सेवेत ६५० उमेदवारांपैकी ८५ टक्के मराठा समाजाच्या उमेदवारांची नियुक्ती केल्याचे या जाहिरातीत म्हटलं आहे.

"सरकारने EWSचं नवीन पिल्लू आणलं, पण EWS हे सर्वांसाठी आहे, आमच्या भावनांशी खेळू नका," असे आंदोलक मनोद जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. "आम्हाला बहाणे सांगू नका. आरक्षणाबाबत आम्हाला कायमचा उपचार करा, तात्पुरती मलमपट्टी नको," असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT