prajakta mali ,raj thackrey sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंच्या भाषणावर मराठमोळ्या अभिनेत्रीनं उधळली 'प्राजक्ताची फुलं'

सभेला उपस्थित राहून तिनं राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (raj thackrey)तोफ डागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी कॉग्रेस, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली. त्याला महाविकास आघाडीतील नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. (prajakta mali praise mns raj thackrey speech)

तर, दुसरीकडे एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं राज ठाकरे यांच्या भाषणाचं कैातुक केलं. तिनं नुसतं कैातुकचं केलं नाही, तर राज यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला. या व्हिडिओंची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. या अभिनेत्रींनी मनसे मध्ये प्रवेश केला का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र तिनं त्यावर आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. सभेला उपस्थित राहून तिनं राज ठाकरेंच्या भाषणाचं कौतुक केलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali)हीनं काल राज ठाकरेंची ठाकरीशैली अनुभवली. प्राजक्ता म्हणाली, ''खूप दिवसांनी मला राजकीय सभा अनुभवायची होती, ती काल पहिल्यांदा अनुभवली ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय, कलाकारानंतर आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. जसं फिल्मफेअर जाणं गरजेचं तसच हेही.., म्हणून हा घाट,'' ''कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही,''असं प्राजक्ता म्हणाली.

राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी घेतला आहे. आव्हाडांनी टि्वट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेच्या नेत्या, माजी महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे. पेडणेकर म्हणाल्या, ''राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. आम्हालाही लोकं विचारतात 'लाव रे तो व्हिडिओ,'' शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं''

''बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना घडवलं त्यातले हे एक आहेत. भाजप त्यांना मांडीवर ही घेत नाहीत, खांद्यावरही घेत नाही. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झाले नाहीत. घरच्यांचा ही इतका द्वेष? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT