राज ठाकरेंना राऊत म्हणाले..अक्कलदाढ येते, पण एवढ्या उशीरा ?

संजय राऊत (Sanjay Raut)यांनीही राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
Raj Thackeray, Sanjay Raut
Raj Thackeray, Sanjay Raut sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या गुढी पाडवा मेळाव्यात झंझावाती भाषण करीत फटकेबाजी केली. आपल्या भाषणात राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नवाब मलिक, छगन भुजबळांचा यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे यांच्या भाषणावर महाविकास आघाडी सरकारमधील नेते तुटून पडले आहेत. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, किशोरी पेडणेकर यांनी राज यांच्या भाषणावर टोलेबाजी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनीही राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Raj Thackeray, Sanjay Raut
तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ निघालं ; राज ठाकरेंच्या भाषणावर शिवसेनेचा हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, "काल शिवतीर्थावर राज ठाकरेंची नाही तर भाजपची सभा झाली. भाषणाची स्क्रिप्ट भाजपने लिहून दिली होती. सभेला भाजपचाच भोंगा होता. एवढंच नाही तर कालच्या सभेत टाळ्याही स्पॉन्सर होत्या. अक्कलदाढ येते हे माहिती होतं, पण एवढ्या उशीरा....?"

"काल मराठी भाषा भवनाचं उद्घाटन झालं. मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. राज ठाकरेंना हे दिसलं नाही का? ते आपले मशीदेवरचे भोंगे उतरवतायत. भाजप आपली मळमळ राज ठाकरे यांच्या भोंग्यातून उतरवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम काम करत आहे. राज्य चांगल्या प्रकारे पुढे नेत आहेत," असे राऊत म्हणाले. ''यूपी बिहारचा विकास व्हायला पाहिजे, पण राज्याचा विकास होतोय तो दिसत नाही,'' असा टोला त्यांना लगावला.

Raj Thackeray, Sanjay Raut
UPAच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवाराचं मोठं विधान, म्हणाले, 'नेतृत्व करण्याची जबाबदारी..'

''शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही देशातील मोठी माणसं आहेत. त्यांच्याबाबत बोलायचं आणि टाळ्या मिळवायच्या. तुम्हीही पवारांच्या चरणाजवळ सल्लामसलत करण्यासाठी जात होताच की... कशाला उगीच आपण टोलेजंग माणसावर बोलायचं",'' असं राऊत म्हणाले. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला. १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याचंही म्हटलं. राज यांच्या या आरोपावरही संजय राऊतांनी टोला हाणला.

''राष्ट्रवादीच्या जन्मापासून महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं आहे. राष्ट्रवादीने दुसऱ्या जातीचा द्वेष निर्माण करायला लावला. त्यामधून समाजात फूट पाडली जात आहे,'' असा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शनिवारी गुढी पाडवा मेळाव्यात केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com