मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (mns)गुढीपाडवा मेळावा शनिवारी शिवाजीपार्क येथे झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार(sharad pawar), अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली.
राज ठाकरे यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या नेत्या, माजी महापैार किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी राज ठाकरेच्या भाषणावर सडकून टीका केली आहे.
पेडणेकर म्हणाल्या, ''राज ठाकरेंचे काल भाषण भाजपने लिहून दिले होतं. आम्हालाही लोकं विचारतात 'लाव रे तो व्हिडिओ,'' शिवसेनेचा द्वेष करण्यासाठी स्वतःचा पक्ष काढला का असा प्रश्न निर्माण होतो. कालच्या त्यांच्या भाषणाबाबत बऱ्याच मनसैनिकांनी आम्हाला सांगितलं की मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल पण भाजपचं गांडूळ निघालं''
''बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांना घडवलं त्यातले हे एक आहेत. भाजप त्यांना मांडीवर ही घेत नाहीत, खांद्यावरही घेत नाही. मुंबईत शिवसेनेचा द्वेष करून कोणीही मोठे झाले नाहीत. घरच्यांचा ही इतका द्वेष? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला.
''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम आपण पाहिलं आहे. आम्ही कामाचा विकासाचा धडाका लावला, कोविड कमी होताच आम्ही लोकापर्णाची कामं सुरु केली आहेत. बाळासाहेबांचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरेंच आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं बाकी डुप्लिकेट लोकांचं काम नाही. ज्या पक्षात उद्धवजी युतीत होते त्यात काय घडलं हे सगळ्यांना माहित आहे. जर राज ठाकरे यांनी ठाकरे म्हणून उद्धवजींशी नाळ जोडली असती तर आज सगळं ठीक असतं,'' असे पेडणेकर म्हणाल्या.
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्यावरील भष्ट्राचाऱ्यांच्या आरोपाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या,''विरोधकांनी फक्त शिवसेनेलाच टार्गेट केलं आहे. जर मुंबईत भ्रष्टाचार दिसतो तर पुण्यात देखील आहेत ते का दिसत नाही, ही कायद्याची लढाई शिवसेना लढेल,''
राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणाचा समाचार राष्ट्रवादीचे नेते, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी घेतला आहे. आव्हाडांनी टि्वट करुन राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ''प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच ... हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात,'' असा टोला आव्हाडांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.