Uddhav Thackeray Speech in marathi bhasah vijay melava 5 july 2025 Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray: हिंदीबाबत फडणवीसांची गुंडगिरी सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंनी फटकारलं

Uddhav Thackeray Speech in marathi bhasah vijay melava 5 july 2025:मराठी भाषाबाबत जर न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करणारच, पण हिंदी भाषेबाबत फडणवीस यांची गुंडगिरी सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

सरकारनामा ब्यूरो

उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे वीस वर्षांनंतर आज एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. हिंदीच्या मुद्दांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाकरी तोफ वरळी डोम येथे धडाडली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.

मराठी भाषेबाबत गुंडगिरी सहन करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होते. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. मराठी भाषाबाबत जर न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करणारच, पण हिंदी भाषेबाबत फडणवीस यांची गुंडगिरी सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

ठाकरे बंधू यांच्या निशाण्यावर कोण असेल, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. राज्यभरातून त्यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी वरळी डोम येथे सकाळपासून गर्दी केली होती, मराठी कलाकारांची उपस्थिती लक्षणीय होती. तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर आदी कलाकार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर, शेतकरी नेते अजित नवले, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

'जय जय महाराष्ट्र माझा..'या महाराष्ट्र गीताने मेळाव्याला सुरवात झाली. व्यासपीठावर येण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या व्हीआयपी रुममध्ये गेले. तेथे दोन्ही नेत्यांनी संवाद साधला. त्यानंतर व्यासपीठावर दोन्ही बंधूंनी ग्रँड एन्ट्री झाली. त्यावेळी उपस्थितांनी जल्लोष केला.

आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचे आहे, असे सांगत पक्षभेद विसरुन आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्यातील 'अंतरपाट' होता तो अंनाजी पंतानी दूर केला, असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

एकत्र आलो आहे,ते एकत्र राहण्यासाठी, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले. आम्ही एकत्र येणार का, असा प्रश्न विरोधकाकडून विचारला जात आहे. आमचा 'म' मुंबई महापालिकेसाठी नाही, तर महाराष्ट्रासाठीही आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी युतीही केवळ मुंबई महापालिकेसाठी नसून 'म' महाराष्ट्रासाठी आहे,असे ते म्हणाले. आजपर्यंत आमचा वापर करुन घेतला आता आम्ही दोघे तुम्हाला उचलून फेकून देऊ, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT