Marathi Vijay Melava: मराठीसाठी दोन भाऊ एकत्र येणार, किमान 3 प्रश्नांची उत्तरे आज देतील का?

Thackeray brothers unity language protest rally: मराठीसाठी हे एकत्र येत नाहीत तर पुन्हा मुंबई महापालिकेची सोन्याची अंडी देणारी कोंबडी हवी आहे त्यासाठीच केवळ ही धडपड सुरू आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर केली आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray
Raj Thackeray & Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

माय मराठीसाठी दोन ठाकरे भाऊ आज वरळीमध्ये एकत्र येत आहे, शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. अशातच भाजपने मराठी विजय मेळाव्याच्या आधी ठाकरे बंधूंना तीन सवाल केले आहे. याची उत्तर आजच्या मेळाव्यात मिळतील का? हे लवकरच समजेल. या तीन प्रश्नांची उत्तरे द्या मग मराठीप्रेमाच्या गप्पा मारा…, असे खुलं आवाहन भाजपनं ठाकरे बंधूंना केलं आहे.

खर तर मराठीसाठी हे एकत्र येत नाहीत तर पुन्हा मुंबई महापालिकेची सोन्याची अंडी देणारी कोंबडी हवी आहे त्यासाठीच केवळ ही धडपड सुरू आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर केली आहे.

Raj Thackeray & Uddhav Thackeray
Marathi Vijay Melava: स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे मराठी जनांना करताहेत..'चलो वरळी'चे आवाहन

भाजपच्या ठाकरे बंधूंना विचारलेले हे तीन प्रश्न

  • वर्षानुवर्षे महापालिकेत सत्तेवर असताना किती मराठी कंत्राटदारांना कंत्राटे दिली व किती अमराठी कंत्राटदारांच्या झोळ्या भरल्या?

  • महापालिकेच्या २१ मराठी शाळांना सीबीएसईने अभ्यासक्रम लावून तिथे मराठी तिसरी भाषा करण्यात आली त्यावेळी मराठी बाणा कुठे गेला?

  • उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा माशेलकर समितीचा फेटाळण्याऐवजी स्वीकारला का?

मुंबईतील वरळी डोम एकत्रित मेळावा होत आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहे. कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असं आवाहन करण्यात आलंय. तब्बल 2 दशकांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यानं मोठी उत्सुकता आहे.

विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून दोन्ही पक्षाते नेते, कार्यकर्ते दाखल होत आहेत. मराठी कलाकारही या मेळाव्याला उपस्थित आहेत. यावेळी तेजस्विनी पंडीत हिने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. सर्व विसरून ठाकरे बंधू एकत्र आले, ही मोठी गोष्ट असल्याचे मत तिने व्यक्त केले.

उद्योजक सुशील केडिया यांनी मराठी भाषेवरुन काल विधान केले होते. मराठी बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांना आवाहन दिले होते. त्यानंतर आज मनसैनिकांनी केडिया यांचे ऑफिस फोडले आहे. मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होतं. राज ठाकरे यांना ट्वीट करीत त्यांनी मनसे आणि राज यांना आव्हान केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com