
Marathi Bhasah Vijay Melava : विजय मेळाव्यासाठी तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर उद्धव ठाकरे-राज ठाकरे आले. मंचावर येताच एकमेकांना अलिंगन त्यांनी दिले. मंचावर फक्त राज-उद्धव ठाकरे दोघेच होते. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठी मुद्यावर राज ठाकरे प्रचंड आक्रमक भूमिका घेतली.
'माझ्या मराठीकडे महाराष्ट्राकडे कोणी वाकड्या नजरेने पाहायचे नाही. हिंदीच्या मुद्यावरून त्यांनी थोडसं चाचपडून पाहिलं. कोण काय करतंय हे चाचपडून पाहिलं. मुंबईला स्वतंत्र करण्यासाठी पाहू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढचे... पण कुणाची माय व्याली ज्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावे. आम्ही शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत.' , असा जाहीर इशारा राज ठाकरे यांनी दिला.
ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली, अशी टीका करतात त्यांच्यावर देखील राज ठाकरेंनी जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, 'यांनी हिंदीच्या मुद्यावर माघार घेतली तर ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियमध्ये शिकलं, असे म्हणातायेत. दादा भुले मराठीत शिकले ते शिक्षणमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकले ते मुख्यमंत्री झाले. कुणा कुणाची मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आमच्याकडे आहेत.'
'सन्मानिय माननीय बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत. यांच्याबद्दल तुम्ही शंका घेऊ शकता का? लाल कृष्ण अडवणी मिशनरी शाळेत शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर संशय घेता का.', असा सवाल देखील देखील राज ठाकरे यांनी केला. तुमचा कडवटपणा तुम्ही शिक्षण कुठे घेतला याच्यावर नसतो तर कडवटपणा तुमच्या आतमध्ये असावा लागतो, असे देखील राज ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.