Protest against builder for insulting Marathi language and people Sarkarnama
मुंबई

Marathi vs Non Marathi Dispute : मराठी युवकाला ‘घाटी’ म्हणत मारहाण; बांधकाम व्यावसायिकाची दादागिरी, मराठी स्वाभिमान भडकला

Mumbai builder Sushil Raheja assaults Marathi youth over 'Ghati' remark : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा यांनी मराठी युवकाला मारहाण केल्याने वाद पेटण्याची शक्यता आहे.

Pradeep Pendhare

Sushil Raheja Builder Controversy: मुंबईतील मराठी-अमराठी वादाला आणखी तडका बसला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा, याने क्षुल्लक कारणाहून, मराठी युवकाला मारहाण करत, 'घाटी' असा उल्लेख केला.

तसंच सुशील रहेजा याच्याविरोधात गोवंडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यातंर्गत गुन्हा दाखल झाला. पण, या प्रकारावरून मुंबईत मराठीविरुद्ध अमराठी, अशा वादाला पुन्हा तोंड फुटलं आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप (BJP) सत्ताधाऱ्याकडून गुजराती महापौर बसवण्याची निश्चित झालं आहे. मराठी एकीकरण समितीने गुजराती महापौरऐवजी मराठी व्यक्तीला महापौरपदावर संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. हा वाद पेटला असतानाच, अमराठी व्यावसायिकाने मुंबईतील मराठी युवकाला 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं', असे म्हणत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

सुशील रहेजा हा मुंबईतील (Mumbai) प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. त्याने त्यांच्याच कार्यालयातील मराठी कामगाराला किरकोळ कारणातून जबर मारहाण केली आहे. याप्रकरणी मराठी युवकाने गोवंडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

सुशील रहेजा याचे डॉ. सी. जी. गिडवाणी रोड, रहेजा होम्स, चेंबूर इथं कार्यालय आहे. तिथं शिपाई म्हणून तक्रारदार कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी कार्यालयात बैठक सुरू होती. कागदपत्रांना जोडून स्टॅपल लावण्याच्या कामात तक्रारदाराकडून क्षुल्लक चूक झाली. त्यावरून सुशील रहेजा याने जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं आहे.

सुशील रहेजाने तक्रादार व्यक्तीला 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारदार हा मागासवर्गीय समाजाचा आहे. पुन्हा नोकरीवर येता येऊ नये, अशी वागणूक रहेजा याने दिल्याचा आरोप, तक्रारदाराचा आहे. यानंतर तक्रारदाराने गोवंडी पोलिसांकडे तक्रार केली.

सुशील रहेजा याच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करून घेताना, कलम 115 बीएनएस 2023सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) 1989 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर पोलिस नेमकं काय पाऊल उचलतील, सुशील रहेजाविरोधात काय कारवाई होईल, याकडे आता लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात मराठीविरूद्ध अमराठीचा वाद गेल्या काही दिवसांपासून पेटला आहे. मुंबईत याची सर्वाधिक धग आहे. बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्या वागणुकीमुळे पुन्हा एकदा हा उफाळलेला आहे. मुंबईतील मराठी-अमराठीच्या वादामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी उठण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT