Ameet Satam Sarkarnama
मुंबई

Mumbai Muslims Controversy : खान नव्‍हे, मराठीच महापौर! तरच ते मुस्लिम आमचे! अमित साटम यांचे ठाम मत

What Ameet Satam said about Muslims and Marathi mayor in Mumbai: मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये महायुती 150पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला.

Pradeep Pendhare

Ameet Satam Muslim Comment: मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम मुंबई महापालिकेच्या महापौरपदी खान नव्हे, मराठीच व्यक्ती विराजमान होईल, असा दावा करताना, मुस्लिमांविषयी मोठं विधान करताना, जे मुस्लिम वंदे मातरम् म्हणतील ते आमचे आहेत, असे म्हटले आहे.

मुंबई महापालिकेत महायुती 150पेक्षा जास्त जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवतील, असा विश्वासही आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला.

मुंबई (Mumbai) भाजपचे अध्यक्ष अमित साटम ‘सकाळ संवाद’मध्ये सहभागी होताना, मुंबईतील विविध मुद्यांवर मनमोकळी चर्चा केली. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं, अशी महायुती आहे. 227 प्रभागांत आम्ही महायुती म्हणून लढू. 227पैकी 150पेक्षा जास्त जागा महायुती जिंकेल, असे विश्वास व्यक्त केला.

महायुतीने (Mahayuti) विजय मिळवल्यास, महापौरपदी कोण विराजमान होणार, यावर भाष्य करताना, 'महापौर कुठल्याही पक्षाचा असू दे. काही फरक पडत नाही. भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असा आमचा आग्रह नाही. मुंबईचा महापौर हा महायुतीचा असेल आणि मराठीच असेल, हे निश्चित आहे. कुठल्याही परिस्थितीत खान महापौर होऊ देणार नाही,’ असे अमित साटम यांनी ठामपणे सांगितले.

महायुतीत जागा वाटपचा तिढा नक्कीच सोडवला जाईल, त्यावर काम सुरू आहे, हे सांगताना, 'ग्राऊंडलेवलची परिस्थिती खूप वेगळी आहे. स्थानिकांचा कल जाणून घेऊन जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाईल. आमच्या सहकारी पक्षात कुठल्याही प्रकारचा वाद नाही.

आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. यात कुठल्या जागेवर कोण लढणार, या सर्व बाबी लोकांची पसंती कुठल्या काम केलेल्या उमेदवाराला आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, यावर अवलंबून निर्णय घेण्यात येतील, असे अमित साटम यांनी सांगितले.

मुस्लिम मतदारांविषयी मोठं विधान

मुस्लिम मतदारांविषयी अमित साटम यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले, ‘जे मुस्लिम वंदे मातरम् म्हणतील ते आमचे आहेत. देशविघातक, समाजविरोधी शक्तींना बरोबर घेऊन कोणी चालणार असेल, पाकिस्तानचे झेंडे फडकवणार असाल किंवा बॉम्बस्फोटातील आरोपीला घेऊन प्रचार करणार असाल, तर ते कसे स्वीकारणार?’ असा सवालही साटम यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

अमित साटम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षांत मुंबई लुटली अन्‌ विकली. त्यात आम्ही वाटेकरी नाही. भाजपचा महापौर, स्थायी समितीचा अध्यक्ष कधीच नव्हता.

आयुक्तापासून सर्व जण शिवसेनेच्या पसंतीचे होते. उद्धव ठाकरेंच्या निर्देशानुसार ते काम करणारे होते. त्यामुळे 25 वर्षांत मुंबई महापालिकेत वाईट घडले त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांनीच घेतलं पाहिजे. पालिका निवडणुकीच्या सहा महिने आधी मराठी माणसाला साद घालायची अन्‌ नंतर पाच वर्षे मुंबई लुटायची, एवढेच त्यांनी केले."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT