MCOCA Ulhasnagar Police  sarkarnama
मुंबई

Crime News : तीन अल्पवयीन मुलांवर मकोका, महाराष्ट्रात पहिल्यांदाच कारवाई; टोळीप्रमुखालाही अटक!

MCOCA Ulhasnagar Police : गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांच्या सहभागाने पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे.त्यामुळे गुन्हेगारांना चाप बसण्याची शक्यता आहे.

Roshan More

MCOCA News : गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिंता देखील व्यक्त केली जात आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने कारवाईसाठी देखील मर्यादा येतात. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच तीन अल्पवयीन आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. उल्हासनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अल्पवयीन मुलांसह टोळी प्रमुख सुमित कदम उर्फ लाला याला देखील मकोका लावत पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमितने आपल्या साथीदारांसह आशेळे गावपाड्यात तलावरीच्या थाक दाखवत तोडफोड केली होती. एका महिलेवर देखील हल्ला करण्यात आला होता.

या घटनेनंतर पोलिस सुमितचा शोध घेत होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याने चौकशीत तीन अल्पवयीन मुले आपल्यासोबत असल्याचे सांगितले. ते देखील या कृत्यात सहभागी होते. सुमितची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने यापूर्वी केलेले गुन्हे पाहात त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन आरोपी हे देखील अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर देखील मकोका कारवाईची विचार पोलिसांनी केला.

उल्हासनगर पोलिसांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत याबाबत सल्ला घेत त्यांच्या परवानगीने सुमितसोबत गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या तीन अल्पवयीन आरोपींना मकोका लावत त्यांच्यावर कारवाई केली.

अल्पवयीन गुन्हेगारांना चाप बसेल

गुन्हेगारी कृत्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग हा चिंता वाढवणार आहे. मोठ्या टोळ्यांकडून देखील अल्पवयीन मुलांचा वापर गुन्हेगारी कृत्य, अंमलीपदार्थ वाहतुकीसाठी केला जातोय.मात्र, आता मकोका अंतर्गत अल्पवयीन आरोपींवर केलेल्या कारवाई धडकी भरवणार आहे.या कारवाईने अल्पवयीन आरोपींना, गुन्हेगारांना चाप बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT