Worali Hit and run - Mihir Shah Sarkarnama
मुंबई

Mihir Shah News : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीरला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी!

Mihir Shah Remanded Police Custody : मिहीरने गाडीमध्येच केस कापले, दाढी काढल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Mayur Ratnaparkhe

Worli hit and Run Case News : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गाडीची नंबर प्लेट ही गहाळ असून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांकडून सरकारी वकीलांनी न्यायालयात युक्तीवाद केला. आरोपीला कोणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली आहे.

दरम्यान, वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातील फरार झालेला मुख्य आरोपी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी (ता.9) अटक केली होती. या अटकेनंतर एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाने देखील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी केली आहे.

आता या अपघातानंतर विरोधीपक्षाकडून शिंदे गटाला टार्गेट करण्यात येत होते. तर अपघातानंतर मिहीर हा फरार झाला होता, तेव्हा पोलिसांनी लगेच कारवाई करत मिहीर याचे वडील राजेश शाह यांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने ही अटक अवैध ठरवली होती.

मिहीर याने शनिवारी (ता.6) रात्री मित्रांसोबत मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. नंतर मिहीर गोरेगावमधील घरी गेला. त्यानं कारचालकाला लाँग ड्राइव्हसाठी जायचं असल्याचं सांगितले. कार घेऊन तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला.

गोरेगावला जाताना मासे आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीवरून प्रदीप नखवा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप यांची पत्नी कावेरी कारच्या बनोटसमोर आल्या मिहीरने कावेरी नाखवा यांना दोन किलोमीटर वरळी सीफेस येथील सी लिंकपर्यंत फरफट नेले. नंतर कार थांबवून गंभीर जखमी अवस्थेतील कावेरी यांना रस्त्यातच सोडून मिहीर वांद्रे-वरळी सागरीसेतूनवरून पसार झाला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT