Worli Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी मिहीरचे वडील राजेश शाह यांची शिवसेनेच्या नेते पदावरून हकालपट्टी

Shiv Sena Removes Rajesh Shah from Post : अपघातानंतर मिहीर हा फरार झाला होता. पोलिसांनी लगेच कारवाई करत मिहीर याचे वडील राजेश शाह यांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने ही अटक अवैध ठरवली.
Worli Hit And Run Accident
Worli Hit And Run AccidentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Hit And Run Case : वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी (ता.9) अटक केली होती. या अटकेनंतर शिंदे गटाने देखील राजेश शाह यांची शिवसेनेच्या उपनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. अपघातानंतर विरोधीपक्षाकडून शिंदे गटाला टार्गेट करण्यात येत होते.

अपघातामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. अपघातानंतर मिहीर हा फरार झाला होता. पोलिसांनी लगेच कारवाई करत मिहीर याचे वडील राजेश शाह यांना अटक केली होती. मात्र, न्यायालयाने ही अटक अवैध ठरवली.

मिहीर याने शनिवारी (ता.6) रात्री मित्रांसोबत मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास ते बारमधून बाहेर पडले. नंतर मिहीर गोरेगावमधील घरी गेला. त्यानं कारचालकाला लाँग ड्राइव्हसाठी जायचं असल्याचं सांगितले. कार घेऊन तो मुंबईत आला आणि मुंबईतून पुन्हा गोरेगावच्या दिशेने निघाला.

गोरेगावला जाताना मासे आणण्यासाठी निघालेल्या दुचाकीवरून प्रदीप नखवा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रदीप यांची पत्नी कावेरी कारच्या बनोटसमोर आल्या मिहीरने कावेरी नाखवा यांना दोन किलोमीटर वरळी सीफेस येथील सी लिंकपर्यंत फरफट नेले. नंतर कार थांबवून गंभीर जखमी अवस्थेतील कावेरी यांना रस्त्यातच सोडून मिहीर वांद्रे-वरळी सागरीसेतूनवरून पसार झाला होता.

Worli Hit And Run Accident
Ashok Chavan : मराठा आरक्षण बैठकीत अशोक चव्हाणांनी जरांगेंच्या भेटीतील मुद्यांवर दिला जोर...

मिहरीनं वांद्रे कलानगर परिसरात कार आणि चालक राजऋषी बिडावत याला सोडले आणि तेथून पसार झाला. गंभीर अवस्थेत निपचित पडलेल्या कावेरी यांना पोलिसांनी Police नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यानं मृत घोषित करण्यात आलं.

यानंतर मिहीरनं वडील राजेश शाह यांना फोन करून घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्यानं मोबाइल बंद केला. सकाळी 8 वाजेपर्यंत मिहीर प्रेयसीच्या घरी थांबला. नंतर सगळ्या माध्यमांमध्ये वृत्त सुरू होताच मित्राच्या घरी जातो, असं सांगून निघून गेला.

पोलिसांनी ओरपी मिहीर शहाचे वडील शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना अटक केली होती. मात्र आरोपी पसार असताना वडिलांना अटक करणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने ठरवत. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर राजेश शहा यांचा जामीन मंजूर केला होता.

Worli Hit And Run Accident
Video Nitish Kumar : नितीश कुमारांचा पारा चढला; स्टेजवरच अधिकाऱ्याचे पाय धरण्यासाठी उठले अन्...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com