Thane Political News : काँग्रेसचे माजी केंद्रीय मिलिंद देवरा यांनी नुकतेच काँग्रेसचा हात सोडून धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवर्य दिवंगत आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिली. तेथे दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस देवरांनी दोन वेळा अभिवादन केले. त्यानंतर आनंदाश्रमाला भेट दिली. देवरां प्रथमच आनंदाश्रमात आले, आणि दोनदा अभिवादन केल्याचे पाहून शिवसैनिक आर्श्चर्य व्यक्त करत आहेत.
मिलिंद देवरा हे शनिवारी दुपारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शक्तीस्थळी दाखल झाले. त्यावेळी देवरांना आलेले पाहून शिवसैनिकांत चर्चा सुरू झाली. त्यानंतर तात्काळ देवरांनी दिघे यांच्या स्मृतीस अभिवादन करत आनंदआश्रम गाठले. तेथून पुन्हा देवरा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शक्तीस्थळावर दाखल झाले.
मुख्यमंत्र्यांसह त्यांनी पुन्हा दिघे यांना अभिवादन केले. यादरम्यान देवरांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. अशाप्रकारे देवरांनी पहिल्यांदा आनंदाश्रमात येताच एकदा नाहीतर दोनदा शिंदे पितापुत्रांच्या उपस्थित अभिवादन केले. यातून देवरा आपल्या मतांसाठी सुपीक जमीन करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मिलिंद देवरांनी (Milind Deora) काँग्रेसशी 55 वर्षांचा असलेला घरोबा तोडला. तसेच एकेकाळी ज्या शिवसेनेमुळे लोकसभेला सलग दोनदा पराभव झाला, त्याच शिवसेनेत (शिंदे गट) त्यांनी प्रवेश केला. शिवसेनेत पडलेली फूट ही देवरांसाठी खऱ्या अर्थाने अडचणीची ठरली. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंनी राज्यात भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केले तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत आपली साथ कायम राखली. परिणामी देवरांना महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवरांनी पक्षप्रवेशासाठी शिवसेनाच का निवडली यालाही एक कारण आहे. भाजप हा अशा नेत्यांना प्रवेश देतो ज्यांच्यामुळे पक्षाला फायदा होईल. मिलिंद देवरांना घेऊन पक्षाला फार काही मदत होऊ शकेल, असे भाजप नेतृत्वाला वाटत नसावे. शिवाय दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसपेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचे देवराही जाणून आहेत. त्यामुळे भाजप प्रवेश केला आणि आपल्याऐवजी इतर कुणाला उमेदवारी दिली तर आगीतून फोफाट्यात, अशी त्यांची अवस्था होण्याची दाट शक्यता होती. यातूनच त्यांनी भाजप सोडून सत्ताधारी शिवसेनेत जाणे पसंद केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.