Milind Deora : लोकसभा की राज्यसभा; आता मिलिंद देवरांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम...

Shivsena Eknath Shinde : मिलिंद देवरा यांनी काँग्रेसशी असलेला 55 वर्षांचा घरोबा तोडला.
Milind Deora, Eknath Shinde
Milind Deora, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं ही झाली भूतकाळातली गोष्ट, मात्र देवरा हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये न जाता थेट शिवसेनेत का गेले याचं उत्तर कदाचित भविष्यकाळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीतच मिळेल. दरम्यान, देवरांना महाविकास आघाडीत उमेदवारीची शक्यता कमी असल्यानेच काँग्रेस सोडल्याची चर्चा आहे. मात्र शिवसेनेत जाऊनही त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम आहे.

शिवसेनेतली फूट देवरांसाठी अडचणीची

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसशी असलेला 55 वर्षांचा घरोबा तोडला. तसेच एकेकाळी ज्या शिवसेनेमुळं लोकसभेला सलग दोनदा पराभव झाला, त्याच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. अर्थात देवरानी प्रवेश केला तो पूर्वाश्रमीच्या ठाकरेंच्या शिवसेनेत नव्हे तर आताच्या शिंदेंच्या शिवसेनेत! शिवसेनेत पडलेली फूट ही देवरांसाठी खऱ्या अर्थानं अडचणीची ठरली. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसोबत आपली साथ कायम राखली.

Milind Deora, Eknath Shinde
Marathwada Water Crisis : दुष्काळात तेरावा महिना; राजेश टोपेंनी थेट मुद्द्यावरच बोट ठेवलं

ज्याचा खासदार त्याचा उमेदवार

ठाकरे गटाच्या Arvind Sawant अरविंद सावंतांकडून दक्षिण मुंबई मतदारसंघातून 2014 आणि 2019 अशा सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मिलिंद देवरांना पराभव झाला. त्या सावंतांनी उद्धव ठाकरेंची साथ काही सोडली नाही. त्यात महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाचे विद्यमान खासदार असतील ती जागा संबंधित पक्षाला दिली जाईल, अशी चर्चा रंगू लागल्यानं देवरांची गोची झाली. या चर्चेनुसार, मविआतील घटक पक्ष ठाकरे गटाचे सावंतांना दक्षिण मुंबई मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी मिळू शकते. तसे झाल्यास काल-परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या देवरांना या जागेवरून निवडणूक लढवणे अशक्य झाले असते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय आडाखे बांधून देवरा यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय.

Milind Deora, Eknath Shinde
Tanaji Sawant Vs Ravindra Gaikwad : रवींद्र गायकवाडांविरोधातला एक डाव उलटताच तानाजी सावंतांनी टाकला दुसरा डाव...

भाजपऐवजी शिवसेना का निवडली?

देवरांनी (Milind Deora) पक्षप्रवेशासाठी शिवसेनाच का निवडली यालाही एक कारण आहे. भाजप हा अशा नेत्यांना प्रवेश देतो ज्यांच्यामुळं पक्षाला फायदा होईल. मिलिंद देवरांना घेऊन पक्षाला फार काही मदत होऊ शकेल, असे भाजप नेतृत्वाला वाटत नसावं. शिवाय दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसपेक्षा भाजपची ताकद जास्त असल्याचे देवराही जाणून आहेत. त्यामुळे भाजप प्रवेश केला आणि आपल्याऐवजी इतर कुणाला उमेदवारी दिली तर आगीतून फोफाट्यात, अशी काहीशी परिस्थिती त्यांची होण्याची शक्यता होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी गुलदस्त्यात

दुसरीकडं दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसपेक्षा आपली ताकद जास्त असल्याने ती आजमावण्यासाठी आणि ही जागा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी भाजपही या जागेवर दावा करू शकते. याच मतदारसंघातून राहुल नार्वेकर लोकसभेची तयारी करत आहेत. त्यामुळे भाजप सहजासहजी शिवसेनेला ही जागा सोडेल का, असाही प्रश्न आहे. शिवसेनेकडून लोकसभेचीच उमेदवारी मिळणार, असेही अद्याप देवरांना कुणीही शब्द दिलेला नाही. त्यामुळं देवरा शिवसेनेत गेले असले तरी त्यांना लोकसभेची उमेदवारी पदरात पडणार की राज्यसभेची हे अजून तरी गुलदस्त्यात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Milind Deora, Eknath Shinde
Devendra Fadnavis : अतुल भोसलेंचा 'तो' हट्ट अखेर फडणवीसांनी पूर्ण केलाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com