Shambhuraj Desai, Uday Samant,Dr Shrikant Shinde  Sarkarnama
मुंबई

Thane Mahayuti Melava: महायुतीच्या मेळाव्यात पालकमंत्री देसाईंचं नाव गायब, तर मंत्री सामंतांची दांडी; खासदार शिंदेंही...

Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा मेळावा पार पडला.

सरकारनामा ब्यूरो

पंकज रोडेकर :

Thane News: लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने महायुतीने जोरदार तयारी सुरू केली असून, राज्यभरात महायुतीचे मेळावे पार पडत आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात येत आहे. या अनुषंगाने ठाण्यातदेखील महायुतीचा मेळावा पार पडला.

या महायुतीच्या मेळाव्याची तारीख जाहीर करताना ठाण्यातील मेळाव्याला ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मेळाव्याच्या दिवशी अचानक पालकमंत्र्यांचे नाव गायब झाले. त्यांच्या जागी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण या मेळाव्याला उद्योगमंत्र्यांनीही दांडी मारली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उशिरा आले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात आयोजित केलेल्या महायुतीच्या पहिल्याच मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्यांनी काढता पाय तर घेतला नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मेळाव्याला जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या मेळाव्याला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (आठवले), पीआरपी, बविआ, जेएसएस, आरएसपी, पीजेपी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, ब.रि. एकता मंच, रिपब्लिकन पक्ष (खरात), शिवसंग्राम आदी 15 पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

या मेळाव्यात सुरुवातीला ठाण्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात आले. पण, मेळाव्याच्या दिवशी देसाई यांचे नाव गायब होऊन त्यांच्या जागी उद्योगमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे (Dr.Shrikant Shinde) यांचे नाव पुढे आले होते. मात्र, उद्योगमंत्री आलेच नाहीत, तर खासदार शिंदे हे मेळाव्याच्या शेवटी येत उशीर झाल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

चौपाटीला पक्षांच्या झेंड्यांचा वेढा

हा मेळावा ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावाजवळील मैदानात होता. त्यातच राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षाचे झेंडे तलाव परिसरात लावले होते. या झेंड्यांनी तलावाला वेढल्याचं पाहावयास मिळालं. यामध्ये सर्वाधिक झेंडे भाजपचे होते.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT