Mira Bhayandar Election: राज्यात सर्वत्र महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. यामध्ये अनेक इच्छुकांची निराशा झाली पण ज्यांना पक्षांनी उमेदवारी अर्ज दिले त्यांचा आनंदही गगनात मावत नव्हता. केवळ अधिकृत उमेदवारी अर्ज मिळाला तरी जिंकल्याचा फील त्यांना येत असल्याचं चित्र होतं. पण एक हळहळ व्यक्त करावी अशी घटना समोर आली आहे. एका उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म मिळाला त्यानं जल्लोषही केला पण काही वेळातच हृदविकाराच्या तीव्र झटक्यानं त्याचं निधन झालं.
मीरा-भायंदर महानगर पालिका क्षेत्रात ही घटना घडली आहे. जावेद पठाण (वय ६६) असं या उमेदवाराचं नाव असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना प्रभाग क्रमांक २२ मधून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. मिरा रोड येथील नया नगर भागातील क्षेत्रीय कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर समर्थक कार्यकर्ते देखील जमले होते. पठाण यांनी अर्ज भरला आणि कार्यालयातून बाहेर पडले, पण तेवढ्यात काळानं त्यांच्यावर झडप घातली. प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तीव्र हृदविकाराचा झटक्यामुळं उपचारांपूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
दरम्यान, याच मिरा-भायंदर महापालिका क्षेत्रातील भाजपच्या नेत्या वनिता बने यांना पक्षानं तिकीटं नाकारलं. तिकीट नाकारल्याचा धक्का त्यांना सहन झाला नाही त्यामुळं त्यांना हृदविकाराचा झटका आला. पण त्यातूनही त्या बचावल्या आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर तिकीट नाकारल्यामुळं अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते. शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाचं आणि उमेदवाऱ्या जाहीर करण्याचं घोंगड भिजत ठेवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांसोबत अनेकांनी आज वादही घातला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही पक्षात नव्यानं दाखल झालेल्या दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यानं अनेकांनी या व्यवस्थेवर टीकाही केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.