PMC Election : पुण्यातील भाजप-शिवसेना युतीवर मुंबईत शिक्कामोर्तब? CM फडणवीस अन् उदय सामंतांनी फिरवला अंतिम हात; गणेश बिडकरांची पोस्ट चर्चेत

Pune BJP ShivSena alliance : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युती जवळपास निश्चित झाली असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उदय सामंत यांच्या उपस्थितीत अंतिम चर्चा झाल्याचे संकेत आहेत.
Chief Minister Devendra Fadnavis with Shiv Sena leader Uday Samant and BJP Pune election in-charge Ganesh Bidkar during key alliance discussions for Pune Municipal Corporation elections.
Chief Minister Devendra Fadnavis with Shiv Sena leader Uday Samant and BJP Pune election in-charge Ganesh Bidkar during key alliance discussions for Pune Municipal Corporation elections.Sarkarnama
Published on
Updated on

PMC Election News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील काही तासांत या युतीची आणि दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतः गणेश बिडकर यांची उपस्थिती दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांनी या युतीला या युतीला मूर्त स्वरुप दिले असल्याची माहिती आहे.

गणेश बिडकर यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदय सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत, यावेळी गणेश बिडकर आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांची उपस्थिती दिसत आहे. उदय सामंत यांच्याकडे शिवसेनेची पुण्याची जबाबदारी आहे. तर राहुल शेवाळे हे मुंबईसाठी युतीच्या चर्चेत महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि गणेश बिडकर हे भाजपकडून पुण्यासाठी युतीची चर्चा करत आहेत. या फोटोमुळे मुंबईत युतीसाठी चर्चा झाल्याचे स्पष्ट होत आहे.

गुरुवारी दुपारी आमदार नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानंतर बिडकर हे मुंबईला रवाना झाले होते. त्यामुळे आता युतीची अंतिम चर्चा ही मुंबईत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होताना दिसत आहे. युतीच्या कोणत्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार हे आता अवघ्या काही तासातच स्पष्ट होईल असे या फोटोवरून दिसत आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांच्या चर्चेनंतर शिवसेनेची जागा वाटपाबद्दलची नाराजी देखील दूर झाली असल्याचे सांगितले जाते.

भाजपची पहिली उमेदवार यादी तयार?

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची पुण्यातील 62 उमेदवारांची पहिली यादीही तयार झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही यादी जाहीर होणार आहे. भाजपने (BJP) मागील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या 99 जागा जिंकल्या होत्या त्यातील 62 जागांची ही यादी असणार आहे.

Chief Minister Devendra Fadnavis with Shiv Sena leader Uday Samant and BJP Pune election in-charge Ganesh Bidkar during key alliance discussions for Pune Municipal Corporation elections.
Maharashtra Political Updates : मुंबईसाठी शिवसेना-भाजप युतीचा फार्म्युला ठरला

भाजपसाठी जिंकण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या या जागांचा असल्याचे सांगितले जाते. यामधील बहुतांश उमेदवार हे माजी नगरसेवक असणार आहेत. अन्य जागांवरही लवकरच निर्णय होऊन शिवसेनेला (Shivsena) जागा सोडल्यानंतर इथल्या उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com