Mira-Bhayandar Mayor Dimple Mehta  sarkarnama
मुंबई

Marathi vs Gujarati : भाजपकडून गुजराती महापौर, मनसे-मराठी समिती आक्रमक; मिरा-भाईंदरमध्ये मोठा ट्विस्ट

Mira-Bhayandar Mayor Dimple Mehta : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौर पदी डिंपल मेहता यांचे नाव भाजपकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यांनी उमेदवारी देखील केली आहे. दरम्यान, गुजराती महापौर नको, अशी भूमिका मराठी एकीकरण समितीने घेतली आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी होत असलेल्या निवडणूकीवरून पुन्हा एकदा मराठी आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपने महापौर पदासाठी अमराठी उमेदवार दिल्याचा निषेध म्हणून मराठी एकीकरण समिती व मनसेकडून महापौर निवडणुकीच्या दिवशी ३ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे.

मीरा भाईंदरचे महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले आहे. या पदावर मराठी व्यक्ती बसविण्यात यावी अशी मागणी मराठी एकीकरण समिती व मनसे कडून करण्यात आली होती. यासंबंधी मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्रव्यवहार करण्यात आला होता. ३० जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भाजपकडून माजी महापौर डिंपल मेहता  यांना उमेदवारी देण्यात आली. त्याचा समितीकडून निषेध करण्यात आला आहे. 

महापालिका निवडणुकीत अनेक स्थानिक आगरी, कोळी महिला निवडून आल्या आहेत. असे असताना भाजपने अमराठी महिला उमेदवाराला महापौर पदाची संधी दिली आहे. समितीने केलेली मागणी डावलून ही निवड झाली असल्याने या विरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असून ३ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख व मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिली.

मीरा रोड येथे काही महिन्यांपूर्वी मराठी बोलता येत नसल्याच्या मुद्द्यावर एका अमराठी व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. त्यानंतर मिरा भाईंदर मध्ये मराठी आंदोलन उभे राहिले व त्याची राज्यभरात दखल घेण्यात आली होती. आता अमराठी महापौर या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठी आंदोलन उभे राहत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT