Modi Government: शिवराजसिंह चौहानांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; मोदी सरकार आणणार नवीन कृषी कायदे, काय होणार फायदे?

Shivrajsingh Chouhan News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या कृषी मेळ्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतानाच सर्वात मोठी घोषणा केली आहे.
Shivrajsingh Chouhan
Shivrajsingh Chouhan Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या कृषी मेळ्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतानाच सर्वात मोठी घोषणा केली आहे. चौहान यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मोदी सरकारच्या लवकर संसदेत आणणार असलेल्या नव्या कृषी कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तरतूद असणार आहे अशी माहितीही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. तसेच या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि त्यांचं मध्यस्थ आणि फसवणुकीपासून संरक्षण करणं हे आहे सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचंही चौहान यांनी म्हटलं आहे.

शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य शेतकरी आणि त्यांचा विकास असल्याचं म्हटलं. काही समाजकंटक बनावट खतांचा वापर करून शेतकऱ्यांची पिके नष्ट करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पण हा आर्थिक गुन्हा असून याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं सांगतानाच संबंधित लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही चौहान यांनी यावेळी दिला.

शेतकऱ्यांना फळझाडे आणि झाडे लावण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आवाहन केलं. पारंपारिक भातशेतीसोबत फळे, भाज्या आणि विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढते यावरही त्यांनी लक्ष वेधलं. सरकार थेट लहान शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे पैसे देत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Shivrajsingh Chouhan
Sunetra Pawar DCM : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांचं मोठं विधान, म्हणाल्या, 'अजितदादांनी आयुष्यभर...'

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांच्या पिकांशी आणि त्यांच्या भविष्याशी छेडछाड करणं यापुढे सहन केले जाणार नाही. बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या विक्रीद्वारे शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर केंद्र सरकार निर्णायक, कठोर आणि दंडात्मक कारवाई करेल असं यावेळी चौहान यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com