Opposition corporators from Congress and Shiv Sena sitting on the floor during Mira Bhayandar Municipal Corporation general body meeting over seating arrangement dispute. sarkarnama
मुंबई

Mira Bhayandar Mayor : महापालिकेत मोठा राडा : महापौरांनी भाजपच्या नगरसेवकांची जागा बदलली: काँग्रेस-शिवसेनेच्या नगरसेवकांचं थेट जमीनवर बसून कामकाज

MBMC General Body chaos : मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत आसनव्यवस्थेवरून गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी निषेध म्हणून जमिनीवर बसून कामकाजात सहभाग घेतला, महापौरांनी बदल नाकारला.

सरकारनामा ब्यूरो

Mira Bhayandar Seating Arrangement Controversy : भाईंदर सभागृहात विरोधी पक्षांसाठी करण्यात आलेल्या आसनव्यवस्थेवरून मिरा-भाईंदर महापालिकेच्या पहिल्याच महासभेत आज (ता.18) गोंधळ झाला. ही आसनव्यवस्था अमान्य करून विरोधी पक्षातील काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी चक्क जमिनीवर बसत सभागृहाच्या कामकाजात सहभाग घेतला.

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर पहिली महासभा बुधवारी (ता.18) पार पडली. आतापर्यंत सभागृहातील उजवी बाजू सत्ताधाऱ्यांसाठी, तर डावी बाजू विरोधी पक्षांसाठी राखीव ठेवली जात असे; मात्र या वेळी महापौरांच्या आदेशाने डाव्या बाजूच्या पहिल्या रांगेत भाजपचे नगरसेवक आसनस्थ झाले. त्यांच्या बाजूला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना स्थान देण्यात आले.

यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. आसनव्यवस्था नेहमीप्रमाणेच असली पाहिजे, अशी भूमिका घेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांची भेट घेतली. मात्र त्यांची मागणी अमान्य करण्यात आली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहातील मोकळ्या जागेत जमिनीवरच ठाण मांडले. महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती यांची स्थापना करून त्यावर सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, तर परिवहन समितीवर बाहेरून सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापौरांचा अधिकार

महापौर व उपमहापौरांनी विरोधी नगरसेवकांना आसनावर बसण्याची विनंती केली. सभागृहातील आसनव्यवस्था ठरविण्याचा अधिकार महापौरांचा असून, सर्वांचा योग्य सन्मान राखत आसनव्यवस्था करण्यात आली आहे आणि त्यात बदल होणार नाही, असे महापौर डिंपल मेहता यांनी स्पष्ट केले.

आयुक्तांचीही विनंती फेटाळली

आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनीदेखील विनंती केली होती, मात्र महापौरांची विनंती फेटाळत विरोधी नगरसेवकांनी जमिनीवरच बसून कामकाज करू, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे महापौरांनी कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी जमिनीवर बसूनच विविध विषयांवर चर्चा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT