Mira Bhayandar election: भाजपच्या विरोधात विरोधक एकवटले; काँग्रेस-शिवसेना शिंदें गटाची आघाडी स्थापन

Mira Bhayandar politics News :राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. महायुतीच्या मदतीने अनेक ठिकाणी भाजप सत्तेत येऊ शकते मात्र काही ठिकाणी सोबत कॊणाला घ्याचे याचा निर्णय झालेला नाही.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. महायुतीच्या मदतीने अनेक ठिकाणी भाजप सत्तेत येऊ शकते मात्र काही ठिकाणी सोबत कॊणाला घ्याचे याचा निर्णय झालेला नाही. तर काही ठिकाणी भाजपला मोठे बहुमत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असली, तरी विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे.

याठिकाणी भाजपच्या विरोधात काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या नगरसेवकांनी एकत्र येत ‘शहर विकास आघाडी’ स्थापन केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या घडामोडीमुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे.

BJP Flag
Congress-Shivsena Alliance : मीरा-भाईंदरमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपच्या विरोधात शिंदेंची शिवसेना-काँग्रेस एकत्र; सरनाईकांनी म्हणाले,'पाशवी बहुमत...'

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली असली, तरी विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे महापालिकेतील राजकारण तापू लागले आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण 95 निवडून आलेले नगरसेवक असून, नियमानुसार आणखी 5 स्वीकृत नगरसेवक नियुक्त होणार आहेत.

BJP Flag
BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपकडे (BJP) तब्बल 78 नगरसेवक असल्याने सत्ता पूर्णपणे भाजपच्या हातात आहे. मात्र, विरोधी बाजूला काँग्रेसचे 13, शिवसेना शिंदे गटाचे 3 आणि 1 अपक्ष नगरसेवक असे एकूण 17 नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याने प्रभावी विरोधी गट उभा राहिला आहे.

BJP Flag
NCP SP Leader : पवारांच्या नेत्याचा मोठा दावा; ‘ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते पुढे आमदार झाले’

महानगरपालिका नियमांनुसार, सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्ष किंवा आघाडीला ‘विरोधी पक्षनेते’ पदाचा अधिकार मिळतो. त्या अनुषंगाने काँग्रेस-शिवसेना (शिंदे गट) यांनी स्थापन केलेली शहर विकास आघाडी ही सध्या महापालिकेतील सर्वात मोठी विरोधी आघाडी ठरत आहे. त्यामुळे या आघाडीला विरोधी पक्षनेते पद, तसेच स्थायी समितीतील सदस्यपद आणि स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा हक्क मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

BJP Flag
BJP News : निष्ठावंतांनी तोफ डागली; ‘भाजपचे पहिले कार्यालय सुरू केले, प्रतिकूल स्थितीतही पक्ष सोडला नाही अन्‌ आता आमचा बळी घेतला गेला’

शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचा दावा

दरम्यान, भाजपाने या घडामोडींवर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचा आरोप आम्ही केला होता, आणि आता तोच आरोप खरा ठरत असल्याचा दावा भाजपाने केला आहे. जनतेसमोर आता विरोधकांचा दुहेरी चेहरा उघडा पडल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच, मिरा-भाईंदर महापालिकेत सत्ता भाजपकडे असली, तरी ‘शहर विकास आघाडी’मुळे राजकीय संघर्ष अधिक धारदार होणार हे निश्चित मानले जात आहे.

BJP Flag
BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com