Mira Bhayandar Municipal Corporation sarkarnama
मुंबई

BJP News : भाजप नगरसेविकेच्या घरातच दोन नराधम : दोन्ही भावांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप; नैतिकता असल्यास राजीनाम्याची मागणी

Mira Road Case : मिरा रोड अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात अटक झालेला आरोपी अनिता पाटील यांचा भाऊ असल्याने वाद वाढला आहे. काँग्रेसने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची मागणी केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mira Road Case: काही दिवसांपूर्वी काशी-मिरा भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. संशयिताला पोलिसांनी लगेच अटक केली होती; परंतु तो मिरा-भाईंदर महापालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे या मुद्द्याला आता राजकीय वळण प्राप्त झाले आहे. पाटील यांना सभापतिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मिरा रोड येथील मुलीवर अनेक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले जात होते. या मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी राजेश चव्हाण याला अटक केली. तो भाजप नगरसेविका अनिता पाटील यांचा भाऊ आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मोठ्या भावानेही पीडिता महापालिकेच्या शाळेत शिकत असताना तिच्यावर अत्याचार केले होते. त्यामुळे महापालिका शाळेतील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली असली तरी शहरातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे.

शहरातील महिला व तरुणींसाठी विविध योजना राबविण्याचे काम महिला व बालकल्याण समिती समितीचे आहे; मात्र सभापतींच्या भावांनीच अत्याचार केले असतील तर अन्य महिला कशा सुरक्षित राहणार, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेत्या आफरीन हुसेन यांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या पुढाकाराने बुधवारी (ता. १०) पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढून पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

काँग्रेसकडून आंदोलनाची तयारी!

अनिता पाटील यांचा गुन्ह्यात थेट सहभाग नसला तरी त्यांनी या विषयावर सोयीस्कर मौन बाळगले आहे. भाजपचे बेटी बचाओ, बेटी पढाओ आणि लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरतीच आहे का, अनिता पाटील यांनी झालेल्या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून सभापतिपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा हुसेन यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT