Mira-Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेचा मोठा निर्णय, विकास आराखडा रद्द! समितीची स्थापना

Mira Bhayandar Municipal Cluster Plan Cancelled: मिरा-भाईंदर महापालिकेने मोठा निर्णय घेत सरकारच्या मान्यतेच्या प्रतिक्षेत असलेला विकास आराखडा रद्द केला आहे.
Mira Bhayandar Municipal Cluster Plan Cancelled
Mira Bhayandar Municipal Cluster Plan Cancelledsarkarnama
Published on
Updated on

प्रकाश लिमये

Mira Bhayandar News : मिरा भाईंदर मधील धोकादायक व अनधिकृत बांधकामांच्या पुनर्विकासाठी मंजूर असलेल्या क्लस्टरचे सर्व आरखडे रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी (ता.20) झालेल्या महासभेत  हा निर्णय  घेण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे. दुसरीकडे मिरा भाईंदरचा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी प्रलंबित असलेला विकास आराखडा देखील रद्द करून त्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे.

मिरा भाईंदर शहरातील धोकादायक, मोडकळीस आलेल्या इमारती, अनधिकृत चाळी, झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना मंजूर झाली आहे. एकंदर 24 ठिकाणी योजना राबविण्याचे नक्की करण्यात आले व त्याचे आराखडे देखील महापालिकेने नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले. त्यासाठी आवश्यक सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपये महापालिकेला दिले आहेत. 

मात्र झोपडपट्टी भागात विरोधामुळे सर्वेक्षणच सुरू होऊ शकले नाही. तर शहरी भागात क्लस्टर मुळे  इमारतींच्या पुनर्विकासला तांत्रिक समस्यांचा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे क्लस्टर योजना सुरूच होऊ शकली नाही.

शुक्रवारी झालेल्या महासभेत क्लस्टरचे सर्व 24 आरखडे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यात लोकांच्या सुविधेसाठी रस्ते, उद्याने, खेळाची मैदाने, शाळा आदींची आरक्षणेच दाखवण्यात आली नव्हती. शिवाय एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीत क्लस्टरची सुविधा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चुकीचे असलेले क्लस्टरचे आराखडे रद्द करण्यात आले असल्याची माहिती उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली.

Mira Bhayandar Municipal Cluster Plan Cancelled
BMC Commissioner : मुंबई महापालिकेला मिळणार महिला आयुक्त? 'या' अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर!

महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती

शहराच्या राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या विकास आरखड्यातही अनेक लोकोपयोगी आरक्षणे ठेवण्यात आलेली नाहीत, शहरातील काही विकसकांनी प्रशासनाला हाताशी धरून स्वत:च्या फायद्यासाठी अनेक आरक्षणे रद्द केली. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द करून आराखड्यातील चूका दुरुस्त करून आवश्यक आरक्षणांचा आराखड्यात समावेश व्हावा यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमहापौरांनी दिली.

Mira Bhayandar Municipal Cluster Plan Cancelled
tukaram mundhe : दिव्यांगांच्या हक्कांसाठी डिजिटल मास्टरस्ट्रोक! तुकाराम मुंढेंचा देशात पहिला प्रयोग चर्चेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com