Balaji Kinikar  Sarkarnama
मुंबई

Balaji Kinikar News : उल्हासनगरमध्ये शिवसेना आमदार अन् राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकामध्ये खडाजंगी

NCP Vs Shinde Group : बालाजी किणीकर अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती.

सरकारनामा ब्यूरो

Ulhasnagar : रस्त्याच्या कामावरून उल्हासनगरमध्ये आमदार आणि माजी नगरसेवकामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विकास कामावरून वाद असल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले आहे. (Latest Marathi News)

अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर आणि उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भरत गंगोत्री यांच्यात चांगलाच वाट पेटला आहे. आता दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात उल्हासनगरचा कॅम्प क्रमांक पाच हा भाग येतो. त्या भागातील भाटिया रस्ता म्हणून ओळखला जाणारा या रस्त्याचे काम एक वर्षापासून रखडले असल्याने दोन दिवसांपूर्वी बालाजी किणीकर यांनी या रस्त्याची पाहणी करून भर रस्त्यात महानगरपालिका अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. भर रस्त्यात महापालिका अधिकाराऱ्यांना आमदारांनी झापले होते.

चौकातील रस्त्याच्या शेजारी असलेला काही दिवसांपूर्वी बांधलेला नाला तोडून महानगरपालिकेने या नाल्याचा प्रवाह रस्त्यावर येत असल्याने येथील चौक विद्रुप होत असल्याचा आरोप बालाजी किणीकर यांनी यावेळी केला होता. यावरून स्थानिक नगरसेवक भरत गंगोत्री आणि आमदार किणीकर यांच्यात वाद झाला आहे. या वादात रस्त्याचा प्रश्न सुटणार का ? असा प्रश्न सामन्य नागरिक विचारत आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT