Shiv Sena MLA Disqualification Case Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरेंना विधिमंडळ आज नोटिसा पाठविणार...

Vijaykumar Dudhale

Mumbai News : आमदार अपात्रतेप्रकरणी आज (ता. ३ ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधिमंडळातून नोटिसा पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि आमदार अपात्रता प्रकरणाच्या कार्यवाहीला वेग येताना दिसत आहे. (MLA disqualification case : Legislature will send notices to Eknath Shinde-Uddhav Thackeray today)

सर्वोच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीसंदर्भात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणाच्या कार्यवाहीला होत असलेल्या विलंबावरून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावले. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज विधिमंडळाकडून नोटीस पाठविण्यात येणार असल्याचे समजते. या नोटिशींद्वारे दोन्ही नेत्यांना शिवसेना पक्षासंदर्भातील पुरावे सादर करण्यासाठी सांगण्यात येणार आहे.

सुनावणीदरम्यान या दोन्ही नेत्यांना समोरासमोर बोलावले जाऊ शकते. त्यांच्याकडून पुरावे मागितले जाऊ शकतात. कारण जुलै-२०२२ मध्ये शिवसेना नेमकी कोणाची होती, हे अध्यक्षांना ठरवायचे आहे. त्यातूनच या दोन्ही नेत्यांना नोटिसा पाठविण्यात येणार आहेत. आता हे दोन्ही नेते समोरासमोर येतात का?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमदार अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी शिवसेना नेमकी कुणाची हे ठरविण्याची कार्यवाही विधिमंडळाकडून सुरू झाली आहे. या विधिमंडळाकडून ठाकरे आणि शिंदे यांना आज नोटिसा गेल्यानंतर ते सुनावणीसाठी विधिमंडळात येतात का?, हेही पाहावे लागणार आहे. एकंदरीतच आता शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना नेमकी कुणाची हे ठरविण्याच्या सुनावणीला वेग आलेला दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT