Manoj Jarange Solapur Tour : मनोज जरांगे 5 ऑक्टोबरपासून सोलापूर दौऱ्यावर; या पाच ठिकाणी होणार जाहीर सभा

Maratha Reservation : जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे येत्या ता. १४ ऑक्टोबर रोजी १०० एकर जागेत मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama

Solapur News : मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई लढणारे जालना जिल्ह्यातील मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणाबाबत रान पेटविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जरांगे पाटील हे येत्या गुरुवारी (ता. ५) आणि शुक्रवारी (ता. ६ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांची सोलापूर शहरासह पाच ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. (Manoj Jarange on tour to Solapur from October 6)

सलग १७ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे येत्या गुरुवारपासून (ता. ५ ऑक्टोबर) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांची सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सभा होणार आहे. याशिवाय मंगळवेढा, बार्शी, कुर्डुवाडी, पंढरपूर या तालुक्यांच्या ठिकाणीही जरांगे पाटील जाहीर सभा घेणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिली.

Manoj Jarange Patil
Junnar Politics : सत्यशील शेरकरांकडे स्नेहभोजन करत शरद पवारांनी केली राजकीय पेरणी...

दरम्यान, मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतला आहे. त्यानुसार त्यांनी राज्याच्या विविध जिल्ह्यांत जाऊन सभांद्वारे जनजागृती करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ते सोलापुरात येत आहेत. या दौऱ्यानंतर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे येत्या ता. १४ ऑक्टोबर रोजी १०० एकर जागेत मराठा आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी (ता. ५ ऑक्टोबर) दुपारी दीडच्या सुमारास सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात दोनच्या सुमारास सभा होणार आहे. त्याच दिवशी मंगळवेढा येथील शिवप्रेमी मैदानावर सायंकाळी पाचच्या सुमारास सभा होईल. पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे सायंकाळी सात वाजता सभा घेणार आहेत.

Manoj Jarange Patil
Shahajibapus Tension Increased : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेनऊच्या सुमारास कुर्डुवाडी येथे सभा होईल. त्यानंतर बार्शी येथील तहसील कार्यालयासमोर सकाळी साडेअकराच्या सभा होऊन जरांगे पाटील यांच्या सोलापूर दौऱ्याची सांगता होणार आहे.

Manoj Jarange Patil
Pawar Ambegaon Sabha : पवारांचा शब्द; 'आंबेगावात लवकरच सभा घेणार, मी अन्‌ खासदार कोल्हे सविस्तर बोलणार'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com