Junnar Politics : सत्यशील शेरकरांकडे स्नेहभोजन करत शरद पवारांनी केली राजकीय पेरणी...

Sharad Pawar Tour : जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Junnar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलेल्या आमदार अतुल बेनके यांना आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जुन्नर दौऱ्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना आपल्या सोबत गाडीत घेणे, दुपारी भोजनासाठी वेळ देणे हे बरेच सांगून जाणारे आहे. जुन्नरमध्ये पवारांनी शेरकरांना सोबत घेणे बेनकेंना इशारा आहे की आगामी राजकारणाची गुंतवणूक आहे, हे काळच स्पष्ट करेल. (During his visit to Junnar, Sharad Pawar made provision for future politics)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जुन्नर दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जुन्नरची उमेदवारी नेमकी कोणाला देणार? याची उत्सुकता वाढली आहे. त्यासोबतच अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्याने उमेदवारी मागणाऱ्यांच्या यादीतही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sharad Pawar
Yavatmal News : कंत्राटी भरतीवरून तरुणांच्या संतापाचा भडका; भीक मागून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले पैसे

आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढणार आहोत. यामध्ये जुन्नर विधानसभेची जागा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसला राहणार असल्याचे मी आज येथे स्पष्ट करतो, असे पवार यांनी शिरोली येथे सत्यशील शेरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादी फुटीनंतर तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी ‘जुन्नरमध्ये माझा शब्द डावलला जात नाही. त्यामुळे अतुल बेनके यांना तालुक्यातील ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी योग्य तो सल्ला दिला आहे, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

जुन्नर येथील आदिवासी अधिकार परिषदेपूर्वी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिरोली बुद्रुक येथील निवासस्थानी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बेनके, देवदत्त निकम आदी नेत्यांनी एकत्रित भोजन केले. यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी संवाद साधला.

Sharad Pawar
Shahajibapus Tension Increased : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन

पवार आणि शेरकर कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. त्यामुळेच जुन्नर येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार हे स्नेहभोजनासाठी घरी आले होते. या वेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केले.

शेरकर यांनी राजकीय चर्चा झाली नाही, असे सांगितले असले तरी पवारांच्या येण्यामुळे शेरकर समर्थकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. याचबरोबर जुन्नर विधानसभा उमेदवारीचा निर्णय मी घेणार असल्याचे पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे बेनके यांनी अजित पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यास सत्यशील शेरकर यांचा विचार होऊ शकतो, हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.

Sharad Pawar
Pawar Ambegaon Sabha : पवारांचा शब्द; 'आंबेगावात लवकरच सभा घेणार, मी अन्‌ खासदार कोल्हे सविस्तर बोलणार'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com