Rahul Narwekar and Supreme Court Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी; नार्वेकर सुधारित वेळापत्रक देणार ?

Rahul Narwekar Delhi Visit : राहुल नार्वेकर यांनी रविवारी दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेतला.

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिरंगाईसंदर्भातील याचिकेवर गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनी नियोजित केलेले वेळापत्रक मान्य नसल्याचे सांगत पुन्हा सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. आता या वरील सुनावणी सोमवारी होणार आहे.

या पार्श्वभूमीवरच राहुल नार्वेकर यांनी रविवारी दिल्लीत जाऊन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली. या भेटीत आमदार अपात्रते प्रकरणासंदर्भात कायदेशीर सल्ला नार्वेकरांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते, याबाबतही नार्वेकरांनी तुषार मेहता यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जाते.

आता सोमवारी होणाऱ्या सुनावणीत राहुल नार्वेकर सुधारीत वेळापत्रक सादर करतात का, आधी सादर केलेल्या वेळापत्रकात नेमकं काय बदल करतात, तसेच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाबाबत नार्वेकरांना नेमकं काय कायदेशीर सल्ला दिला, या सर्व प्रश्नाची उत्तरे आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतरच समोर येणार आहेत.

दरम्यान, आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. मात्र, या सुनावणीला जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

यानंतर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन वेळा अत्यंत कठोर शब्दांत फटकारलं होतं. तसेच सुधारित सुनावणीचे वेळापत्रक 30 ऑक्टोबरला सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता न्यायालयाने सुनावल्यानंतर सोमवारी सुधारित वेळापत्रक सादर केलं जाणार का ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT